वाढदिवसाच्या दिवशीच पशुप्रेमीची आत्महत्या !

By Admin | Updated: July 2, 2016 03:02 IST2016-07-02T03:02:35+5:302016-07-02T03:02:35+5:30

वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सीवूड येथे घडली आहे.

Veteran suicide on the day of birth! | वाढदिवसाच्या दिवशीच पशुप्रेमीची आत्महत्या !

वाढदिवसाच्या दिवशीच पशुप्रेमीची आत्महत्या !


नवी मुंबई : वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सीवूड येथे घडली आहे. या पशुप्रेमी तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्याच्याकडील श्वानांची काळजी घेण्याचे घरच्यांना सुचवले आहे. परंतु त्याच्या आत्महत्येचे ठोस कारण समजले नसून एनआरआय पोलीस ठाण्यात सदर घटनेची नोंद करण्यात आली आहे.
शुभम देसाई (२२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सीवूड सेक्टर ४६ येथील गुरुदत्त सोसायटीत तो अनेक वर्षांपासून सहकुटुंब रहायला होता. शुभम हा लहानपणापासूनच परिसरात पशुप्रेमी म्हणून परिचित होता. ८ ते १० वर्षांपूर्वी भटक्या श्वानाला मारणाऱ्या इमारतीच्या सुरक्षारक्षकाविरोधात पोलिसांकडे तक्रार देखील केली होती. पुढे याच श्वानप्रेमातून त्याने पाळीव श्वान विक्री व सांभाळण्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला होता. जन्मदिवस असल्यामुळे बुधवारी रात्री तो घरच्यांना जेवणासाठी हॉटेलमध्ये घेवून गेला होता, तर त्यांना हॉटेलमध्ये बसवल्यानंतर मित्रांना पार्टी देण्यासाठी नेरुळला गेलेला. तिथून काही वेळातच परत आल्यानंतर घरच्यांना हॉटेलमध्येच बसवून काही कारणाने तो एकटाच घरी गेला. परंतु बराच वेळ होवूनही तो परत न आल्यामुळे सर्व जण घरी गेले असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळून आले. यामुळे दरवाजा तोडला असता आतमध्ये गळफास लावलेल्या स्थितीत शुभमचा मृतदेह आढळून आला.
घरच्यांना व मित्रांना पार्टी दिल्यानंतर आत्महत्येसाठी दुकानातून रस्सी खरेदी करून तो घरी गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामध्ये शुभमला येणे असलेल्या पैशाचा हिशेब तसेच श्वानांप्रति प्रेमही व्यक्त केलेले असल्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर बगाडे यांनी सांगितले. कुत्र्यांना त्रास देवू नका, त्यांना मारू नका असे सांगत आपल्या पश्चात त्यांची काळजी घेण्याचे त्याने चिठ्ठीमध्ये लिहिलेले आहे. एनआरआय पोलीस ठाण्यात त्याची नोंद करण्यात आली.

Web Title: Veteran suicide on the day of birth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.