वयोवृद्ध नागरिकांची फसवणूक करणारा हिरे व्यापारी गजाआड
By Admin | Updated: June 21, 2016 14:10 IST2016-06-21T14:05:40+5:302016-06-21T14:10:19+5:30
परदेशातील नातेवाईकांची खोटी ओळख दाखवून वृद्ध मुंबईकरांना लाखो रूपयांचा गंडा घालणा-या डायमंड व्यापा-याला मुंबई पोलिसांनी अटक केली

वयोवृद्ध नागरिकांची फसवणूक करणारा हिरे व्यापारी गजाआड
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - परदेशातील नातेवाईकांची खोटी ओळख दाखवून वृद्ध मुंबईकरांना लाखो रूपयांचा गंडा घालणा-या डायमंड व्यापा-याला मुंबई पोलिसांनी अटक केली. सुनील प्रेमजी पुजारा (५०) असे अटक केलेल्या व्यापा-याचे नाव असून तो गेल्या १२ ते १५ वर्षापासून तो वृद्धांची फसवणूक करत आहेत. ११ वर्षापूर्वी माटुंगा पोलिसांनी फसवणुकीच्या गुह्यांत त्याला अटक केली होती.
मुंबईत एकट्या राहत असलेल्या वयोवृद्ध नागरिकांच्या परदेशात राहत असलेल्या नातेवाईकांची ओळख दाखवून तो त्यांना लुटत असे.