नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ रंगकर्मी फैयाज
By Admin | Updated: October 13, 2014 04:42 IST2014-10-13T04:42:11+5:302014-10-13T04:42:11+5:30
९५व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेत्री व गायिका फैयाज शेख यांची निवड झाली आहे

नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ रंगकर्मी फैयाज
मुंबई : ९५व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेत्री व गायिका फैयाज शेख यांची निवड झाली आहे. नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
हे नाट्यसंमेलन ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत बेळगाव येथे घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या वेळी नियामक मंडळाच्या सदस्यांनी एकमताने या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्ष म्हणून फैयाज यांची निवड केल्याची माहिती नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी दिली. फैयाज यांनी मराठी रंगभूमीवर आपला वेगळा ठसा उमटविला आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील झरीना, ‘वीज म्हणाली धरतीला’मधील जुलेखा, ‘गुंतता हृदय हे’मधील कल्याणी, ‘मत्स्यगंधा’तली सत्यवती अशा नानाविध भूमिकांत त्यांच्या अभिनयाची आणि गायकीची छाप आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ हे नाटक त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरले. या नाटकाने त्यांना रंगभूमीवर विशेष ओळख मिळवून दिली.