ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर रुग्णालयात दाखल
By Admin | Updated: October 25, 2014 14:34 IST2014-10-25T14:33:53+5:302014-10-25T14:34:15+5:30
प्रकृती बिघडल्याने ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर रुग्णालयात दाखल
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - प्रकृती बिघडल्याने ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमरापूरकर यांच्या फुफ्फुसात जंतुसंसर्ग झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्रास बळावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शनिवारी त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. एक उत्कृष्ट अभिनेते म्हणून प्रसिद्ध असलेले अमरापूरकर एक सुजाण नागरिक म्हणूनही परिचीत आहेत. गेल्या वर्षी रंगपंचमीदरम्यान मोठ्या आवाजात गाणी लावणा-या तसेच पाण्याचा अपव्यय करणा-यांबद्दल त्यांनी पोलिसांत तक्रारही केली होती, मात्र त्याच लोकांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला होता.