स्वातंत्र्य सैनिक स्मारकाच्या प्रतीक्षेत वेसावे कोळीवाडा!
By Admin | Updated: August 15, 2016 03:15 IST2016-08-15T03:15:24+5:302016-08-15T03:15:24+5:30
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या वेसावे कोळीवाड्यातील ११४ स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक उभारण्याची मागणी वेसावेकरांकडून होत आहे.

स्वातंत्र्य सैनिक स्मारकाच्या प्रतीक्षेत वेसावे कोळीवाडा!
मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या वेसावे कोळीवाड्यातील ११४ स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक उभारण्याची मागणी वेसावेकरांकडून होत आहे. येथील कोळी महिलांसह स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या ११४ स्वातंत्र्यसैनिकांपैकी केवळ २-३ स्वातंत्र्य सैनिकच आत्ता हयात आहेत. किमान त्यांच्या हयातीमध्ये तरी हे स्मारक उभारावे, अशी मागणी वेसावेकरांमधून जोर धरू लागली आहे.
वेसाव्यातील समुद्रकिनारी असलेल्या वेसावे स्मशानभूमीशेजारी हे स्मारक उभारण्याचे आवाहन वेसावेकरांनी केले आहे. कारण
सध्या स्मशानभूमीशेजारील पालिकेच्या या भूखंडावर अतिक्रमण झाले आहे.
तरी या जागेवर स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक करावे, ही वेसावकरांची जुनी मागणी आहे. त्यामुळे वेसाव्याच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर आणि ं्नँमहापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष व स्थानिक नगरसेवक यशोधर फणसे यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालावे व वेसावेकरांची अनेक दिवसांची इच्छा पूर्ण करावी, अशी मागणी वेसावकरांनी केली आहे. (प्रतिनिधी)