‘व्हेरी हॅप्पी लॅण्डिंग..’

By Admin | Updated: November 16, 2014 01:42 IST2014-11-16T01:42:45+5:302014-11-16T01:42:45+5:30

भारतीय सैन्य दलामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणा:या हेलिकॉप्टर वैमानिकांच्या 22व्या तुकडीच्या 37 जवानांनी अठरा आठवडय़ांचे कठोर प्रशिक्षण यशस्वीपणो पूर्ण केले.

'Very Happy Landing' | ‘व्हेरी हॅप्पी लॅण्डिंग..’

‘व्हेरी हॅप्पी लॅण्डिंग..’

नाशिक : भारतीय सैन्य दलामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणा:या हेलिकॉप्टर वैमानिकांच्या 22व्या तुकडीच्या 37 जवानांनी अठरा आठवडय़ांचे कठोर प्रशिक्षण यशस्वीपणो पूर्ण केले. गांधीनगर येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’च्या आवारात झालेल्या निरोप समारंभामध्ये लष्करी थाटात वरिष्ठ लष्करी अधिका:यांच्या हस्ते जवानांना ‘एव्हिशन विंग’ प्रदान करण्यात आली. दरम्यान, आकाशी सैनिकांनी सादर केलेल्या युद्धभूमीवरील प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना शहारे आले.
गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये लढाऊ हेलिकॉप्टर चालनाचे प्रशिक्षण 37 जवान घेत होते. जवानांनी यशस्वीपणो लढाऊ हेलिकॉप्टर चालविण्याचे तंत्र आत्मसात के ले असून, सैन्यदलामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी सज्जता दाखविली आहे. वैमानिक जवानांच्या 22व्या तुकडीचा निरोप समारंभ मोठय़ा थाटात संपन्न झाला. या वेळी लष्करी बॅण्डपथकाच्या तालावर तुकडीने परेड सादर करत उपस्थित लष्करी अधिका:यांना मानवंदना दिली. त्यानंतर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणो म्हणून उपस्थित असलेले पंजाब रेजिमेंटचे कर्नल लेफ्टनंट जनरल बी.एस. सच्चर यांनी परंपरेनुसार वैमानिक जवानांना ‘एव्हिएशन विंग’ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. या वेळी ‘कॅट्स’चे ब्रिगेडियर कंवलकुमार, कर्नल किरण गोडे, अे.के. मिश्र उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 
युद्धजन्य परिस्थितीचा थरार
दहा हजार फूट उंचीवरून पॅराशूटमधून युद्धभूमीवर उतरणारे जवान, लढाऊ ‘चित्ता’द्वारे जवानांकडून युद्धभूमीचा घेतलेला आढावा आणि तत्काळ सैनिकांना पाचारण करण्याच्या दिलेल्या सूचना. दोन ‘ध्रुव’ हेलिकॉप्टरद्वारे युद्धभूमीवर पोहोचलेली सैनिकांची सशस्त्र तुकडी. सैनिकांकडून शत्रूच्या छावणीवर सुरू झालेला गोळीबार. दरम्यान, धुराच्या नळकांडय़ा फोडून वातावरणात धुसरता निर्माण करण्याचा सैन्याने केलेला प्रयत्न आणि ही संधी अचूकपणो साधत चित्ता हेलिकॉप्टरद्वारे पोहोचविण्यात आलेली रसद. रसदचा पुरवठा होताच सैन्याकडून मारा तीव्र केला जातो आणि शत्रूच्या छावणीवर ताबा मिळविण्यामध्ये सैन्याला यश येते. अशा युद्धजन्य परिस्थितीचा थरार उपस्थितांनी अनुभवला.

 

Web Title: 'Very Happy Landing'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.