शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् ठाण्यातील विश्वासू शिलेदारामध्ये खडाजंगी? चर्चा रंगली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 10:09 IST

ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदार संघ हा शिवसेनेचा आहे. प्रताप सरनाईक हे ओवळा माजिवाडा मतदार संघाचे आमदार आहेत

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे ठाण्यातील विश्वासू शिलेदार आमदार प्रताप सरनाईक यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ओवळा माजिवाडा मतदारसंघावरून या दोघांमध्ये बाचाबाची झाली. सरनाईक यांचा मतदारसंघ भाजपाला सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत. मात्र सरनाईक त्यास तयार नसल्याने हा वाद निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. 

ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदार संघ हा शिवसेनेचा आहे. प्रताप सरनाईक हे ओवळा माजिवाडा मतदार संघाचे आमदार आहेत. हा मतदारसंघ भाजपाला सोडावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्याला सरनाईकांनी विरोध केल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि सरनाईक यांच्यात बेबनाव असल्याचं दिसून येते. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नगरविकास खात्याच्या एका कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व्यासपीठावर असताना त्याठिकाणी सुरुवातीला प्रताप सरनाईक दिसत नव्हते. कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर सरनाईक यांना व्यासपीठावर येण्याची विनंती केली. 

सरनाईक यांच्यासोबत वादावर मुख्यमंत्री म्हणाले...कार्यक्रमानंतर पत्रकारांनी प्रताप सरनाईक आणि तुमच्यात खटके उडाल्याच्या चर्चा आहेत असा प्रश्न केला त्यावर शिंदे म्हणाले की, आम्ही तुमच्यासमोर आहोत. आम्ही काम करणारे लोक आहोत. आमचा फोकस राज्याला विकासाकडे नेण्याचा आहे. एखादे काम सुरू होतं वर्षानुवर्षे रेंगाळतं. त्यामुळे विकासासाठी आम्ही काम करत आहोत असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाष्य करणं टाळलं. 

दो दिल और एक जान है हम !! मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतच्या वादावर प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पूर्वेश यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो पोस्ट करत !! दो दिल और एक जान है हम !! असं कॅप्शन दिले आहे. त्यामुळे शिंदे-सरनाईक वादावर हे प्रत्युत्तर असल्याचं म्हटलं जात आहे. 

असा आहे प्रताप सरनाईक यांचा राजकीय प्रवासराष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक झालेले प्रताप सरनाईक यांनी २००८ साली शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला. लगेचच २००९ मध्ये प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील ओवळा-माजिवाडा मतदारसंघातून विधानसभा निवडणुक लढत विजय मिळवत आमदारही झाले. याच मतदारसंघातून ते २००९, २०१४ आणि २०१९ साली सलग तीनवेळा आमदार निवडून आले. या मतदारसंघात ठाणे महानगरपालिकेसह मीरा- भाईंदर महानगरपालिकेचा देखील काही भाग येतो. ठाण्यातील लोकमान्यनगर, वर्तकनगर शास्त्रीनगर, शिवाजीनगर अशा बैठ्या चाळीच्या मध्यम आणि गरीब वर्गाच्या विभागापासून ते थेट वाघबीळ, कासारवडवली, माजिवडा, गायमुखपर्यंतचा भाग याच मतदारसंघांमध्ये येतो. तर दुसरीकडे मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विभागातल्या चेन्ना गाव, घोडबंदर गाव, वर्सोवा, काशिमिरा, गोल्डन नेक्स्ट, नवघर हे विभाग देखील ओवळा माजिवाडा याच मतदारसंघात येतात. येथे सरनाईक यांची मजबूत पकड आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेpratap sarnaikप्रताप सरनाईकBJPभाजपा