शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
3
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
5
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
6
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
7
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
8
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
9
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
10
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
11
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
12
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
13
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
14
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
15
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
16
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
17
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
18
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
19
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
20
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडीतून वाहनांचा ‘रिव्हर्स गिअर’

By मनीषा म्हात्रे | Updated: August 31, 2025 15:35 IST

मराठा बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात शनिवारी दुसऱ्या दिवशीही सीएसएमटी परिसर तीन तासांहून अधिक वेळ अडवून ठेवला.

मनीषा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘बम, बम बंबई देखो जम गयी’, म्हणत मराठा बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात शनिवारी दुसऱ्या दिवशीही सीएसएमटी परिसर तीन तासांहून अधिक वेळ अडवून ठेवला. त्यामुळे दक्षिण मुंबई सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा ठप्प पडली. पोलिसांच्या अतिरिक्त फौजफाट्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे-पाटील यांच्या भाषणाची ऑडिओ क्लिप त्यांना ऐकविली. लोकांना वेठीस धरू नका. कोंडी करू नका, असे आवाहन करूनही मार्ग निघत नसल्याने पोलिसांनी मागच्या बाजूने वाहने सोडण्यास सुरुवात केली. वाहनांनी थेट रिव्हर्स गिअर घेत तीन तासांहून जास्तीच्या कोंडीतून शांतपणे मार्ग काढल्याचे दिसून आले.

रात्री खाण्या-पिण्याच्या गैरसोयीसह अनेकांनी भरपावसात रस्त्यावर ठाण मांडला. शुक्रवारी सायंकाळी आंदोलनासाठी दुसऱ्या दिवसाची मुदतवाढ मिळाल्याचे समजताच मागे फिरलेल्या वाहनांनी पुन्हा यू टर्न घेतला. अनेकांनी थेट सीएसएमटी ते थेट क्रॉफर्ड मार्केट परिसरात दोन्ही बाजूंनी शेकडो वाहने पार्क केली. शनिवारी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात ते आठ वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील रस्त्यावर सकाळीच मराठा आंदोलक पुन्हा एकवटले. आंदोलनाचा सर्वाधिक फटका हा दक्षिण मुंबईला पुन्हा बसला. फोर्ट, टपाल कार्यालय, मंत्रालय, नरिमन पॉइंट, गिरगाव, जे. जे. उड्डाणपूल या परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पुन्हा एकदा जे. जे. मार्गपासून भायखळ्यापर्यंत रांगा लागल्या. तीन ते चार बेस्ट बससह खासगी वाहने अडकली. बराच वेळ ताटकळत बसल्यानंतर बसमधील प्रवाशांनी तेथेच खाली उतरून पायी रेल्वेस्थानक, कार्यालये गाठावी लागली.

पोलिसांनी काढली समजूतकोणी रस्त्यावर झोपले तर कोणी थेट गाण्यावर ठेका धरला. अनेकांनी मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत वाट सोडणार नसल्याचे सांगितले. सह-पोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलिस आयुक्त अभिनव देशमुख, पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी समन्वयकांच्या मदतीने त्यांना समजावले.

रस्ता अडविण्याचा प्रयत्न विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारी चारच्या सुमारास  पुन्हा बरसायला सुरुवात केली. पुन्हा मराठा बांधव रस्त्यावर उतरले. सीएसएमटी समोरील दोन्ही वाटा अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळ न दवडता पुन्हा वाहने पाठीमागे फिरवत कोंडी सोडविली. गाण्याच्या तालावर मराठा बांधवांनी रस्त्याच्या मध्यभागीच ताल धरत वाहने अडवली.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईMaratha Reservationमराठा आरक्षण