‘एव्हीएच’मध्ये वाहने पेटवली
By Admin | Updated: June 4, 2015 04:05 IST2015-06-04T04:05:21+5:302015-06-04T04:05:21+5:30
तालुक्यातील हलकर्णी येथील ‘एव्हीएच’ प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांना सुपे फाट्यानजीक हल्लेखोरांनी वाहने अडवून बेदम मारहाण केली

‘एव्हीएच’मध्ये वाहने पेटवली
अलिबाग : सावित्री नदीमधील मगरींचे अस्तित्व बीरवाडी परिसरातील औद्योगिक कारखान्यांच्या प्रदूषित पाण्यामुळे धोक्यात आले आहे. महाड शहरातील गवळ आळीशेजारील नदीकिनारी मंगळवारी सकाळी १० फूट लांबीची एक मगर मृतावस्थेत आढळून आली. यामुळे नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाईची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
मृत मगरीस महाड नगर परिषदेच्या एका डंपरमधून शवविच्छेदन आणि उत्तरीय तपासणीकरिता महाड स्मशानभूमीत नेण्यात आले. सुमारे ४०० किलो वजनाच्या या मृत मगरीचे शवविच्छेदन महाडच्या पशुसंवर्धन विभागाचे साहाय्यक आयुक्त डॉ. आर. के. कोळेकर यांनी केले. या मगरीचे वयोमान अंदाजे २० वर्षे असून, तिचा नैसर्गिक मृत्यू असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.
पुण्यातील पर्यावरणप्रेमी
युवक आणि महाडमधील सावली संस्थेने दोन वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात ७० मगरी आढळल्या होत्या. आता त्यांची संख्या १०० च्या आसपास वाढली असल्याचे सावली संस्थेने प्रमुख व प्राणीमित्र गणराज जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. संवेदनशील प्राणीमित्र आणि सफर प्राणी संरक्षण केंद्राचे राजेंद्र मुसळे, विनोद जाधव, वनक्षेत्रपाल आर.बी.पाथरवट, परिमंडळ वन अधिकारी एम.एस.पांडे, वनरक्षक एम.एस.देवरे,एम.एम.चव्हाण,पी.एम.पवार आदींनी मृत मगरीवर विधिवत अंत्यसंस्कार केले. (विशेष प्रतिनिधी)