पुण्यात पुन्हा वाहन जळीतकांड, सात दुचाकी जाळल्या

By Admin | Updated: May 8, 2016 08:22 IST2016-05-08T08:22:27+5:302016-05-08T08:22:27+5:30

पुण्यात पुन्हा एकदा वाहन जळीतकांडाची घटना समोर आली आहे. पुण्यातील उत्तमनगर परिसरातील एका सोसायटीत उभ्या असलेल्या सात दुचाकी अज्ञात आरोपींनी पेटवून दिल्या.

The vehicle was burnt again in Pune, seven bets were burned | पुण्यात पुन्हा वाहन जळीतकांड, सात दुचाकी जाळल्या

पुण्यात पुन्हा वाहन जळीतकांड, सात दुचाकी जाळल्या

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. ८ - पुण्यात पुन्हा एकदा वाहन जळीतकांडाची घटना समोर आली आहे. पुण्यातील उत्तमनगर परिसरातील एका सोसायटीत उभ्या असलेल्या सात दुचाकी अज्ञात आरोपींनी पेटवून दिल्या. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या सातही दुचाकी आगीत जळून खाक झाल्या. 
 
आगीच्या ज्वाळा नजरेस पडताच सोसायटीतील रहिवाशांनी तात्काळ अग्निशमन दलाला या आगाची माहिती दिली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून ही आग विझवली. मध्यरात्री दोन ते तीनच्या दरम्यान आरोपींनी हे कृत्य केले. 
 
आगीच नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी, जाणूनबुजून ही आग लावल्याचा स्थानिकांनी दावा केला आहे. पुण्यात वाहन जळीत कांडाची ही अशी पहिली घटना नाही. यापूर्वीही पुणे, नाशिकमध्ये वाहन जळीत कांडाच्या अनेक घटना घडल्या आहेत. 

Web Title: The vehicle was burnt again in Pune, seven bets were burned