वाहनात बिघाड; गृहराज्यमंत्री अकोल्यात
By Admin | Updated: July 3, 2015 23:38 IST2015-07-03T23:38:32+5:302015-07-03T23:38:32+5:30
अकोल्यात पोलीस आयुक्तालय डिसेंबर २0१५ पर्यंत कार्यान्वित होणार असल्याची दिली माहिती.

वाहनात बिघाड; गृहराज्यमंत्री अकोल्यात
अकोला - अकोला शहराची वाढलेली लोकसंख्या आणि त्याचबरोबर शहरातील गुन्हेगारीने गाठलेला कळस पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे. शहरातील ही गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्तालयाची नितांत आवश्यकता असल्याने अकोल्यातील पोलीस आयुक्तालय डिसेंबर २0१५ पर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ग्रामिण राम शिंदे यांनी शुक्रवारी दिली. बाभूळगाव जहाँगीरनजीक त्यांच्या वाहनात बिघाड झाल्याने सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याला दिलेल्या आकस्मिक भेटीत त्यांनी ही माहिती दिली.