कैद्यांनी विकला बाजारात भाजीपाला
By Admin | Updated: February 25, 2016 00:33 IST2016-02-25T00:33:17+5:302016-02-25T00:33:17+5:30
गडचिरोलीच्या खुल्या कारागृहात उत्पादित झालेल्या भाजीपाल्याची बुधवारी सकाळी पहिल्यांदाच शहराच्या गुजरी बाजारात विक्री करण्यात आली. कैदी भाजीपाला घेऊन विक्रीसाठी

कैद्यांनी विकला बाजारात भाजीपाला
गडचिरोली : गडचिरोलीच्या खुल्या कारागृहात उत्पादित झालेल्या भाजीपाल्याची बुधवारी सकाळी पहिल्यांदाच शहराच्या गुजरी बाजारात विक्री करण्यात आली. कैदी भाजीपाला घेऊन विक्रीसाठी बसल्यानंतर ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळली होती. अवघ्या दहा मिनिटांतच २० किलो मेथी व १५ किलो पालकाची विक्री करण्यात आली.
कारागृहाच्या परिसरात लावण्यात आलेली वांगी, भेंडी, टोमॅटोे, दुधी भोपळा व चवळी यांचीही विक्री पुढील महिन्यात बाजारात करण्यात येणार आहे, अशी माहिती कारागृह अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)