शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

भाजीपाल्यांचे भाव कडाडले

By admin | Published: September 21, 2016 2:21 AM

गणेशोत्सव संपून पितृपंधरवडा सुरू झाल्याने सांगवी, पिंपळे गुरव व दापोडी परिसरात पालेभाज्यांचे भाव कडाडल्याचे चित्र दिसत आहे.

पिंपळे गुरव : गणेशोत्सव संपून पितृपंधरवडा सुरू झाल्याने सांगवी, पिंपळे गुरव व दापोडी परिसरात पालेभाज्यांचे भाव कडाडल्याचे चित्र दिसत आहे. भाजीविक्रीच्या ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. घरातील व्यक्तीचे निधन झाल्यास त्याचे स्मरण करून त्याच्या आत्म्यास शांती लाभावी, यासाठी सग्या-सोयऱ्यांना भोजन दिले जाते. भोजनामध्ये विविध पालेभाज्यांचा समावेश असतो. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे मेथी, कारले, गवार, मिरची, खीर, चपाती, अळू, पुरण पोळी हे भोजनातील पदार्थ असतात. पितृपंधरवड्यात मांसाहार वर्ज्य करून धार्मिक विधी केले जातात. जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईच्या भस्मासुरांमुळे १०० नागरिकांचे जेवण घालण्यास १० हजार रुपयांच्या पुढे खर्च येतो. एवढ्या महागड्या वस्तू खरेदी करणे काही कुटुंबांच्या आवाक्याबाहेर जात आहे. किराणा वस्तू व पालेभाज्यांची खरेदी करणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे केवळ फक्त ठरावीक जवळच्या नातेवाइकांना पितृपंधरवाड्याचे भोजन देऊन कोणताही डामडौल न करता थोडक्या नातेवाइकांवरच कार्यक्रम पार पाडण्याचे चित्र बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे. सध्या पितृपक्ष सुरूझाला असून, पितृपक्षाच्या कार्यक्रमात नैवेद्यासाठी आवश्यक असणाऱ्या भाजीपाल्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली असून, सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. यामध्ये महिला गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. (वार्ताहर)> आवश्यक भाजीपाला गुलटेकडी, खडकी मार्केट येथून आणावा लागतो. सध्या पावसाची संततधार असल्यामुळे भाज्यांची आवक कमी प्रमाणात आहे. भाजीपाल्यांचे ठोक किमती वाढल्याने, तसेच घेतलेल्या भाज्यांची इंधन वाहतूक वाढली आहे. त्यातच पितृपंधरवड्यामुळे लागणाऱ्या सर्व प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी ठेवाव्या लागतात. ग्राहक मात्र भाज्यांच्या किमतीसाठी घासाघीस करतात. - नारायण बर्गे, भाजीविके्रते, पिंपळे गुरव>पितृपंधरवड्यामुळे पालेभाज्यांचे भाव कडाडल्याने भोजन देणाऱ्या खाणावळचालकांनी चांगलाच धसका घेतला आहे. आठवडाभरापूर्वी खाणावळीमध्ये तीन भाज्या असायच्या. आता मात्र एक किंवा दोनच भाज्या द्याव्या लागत आहेत. पितृपंधरवड्यासाठी लागणाऱ्या भेंडी, दुधी भोपळा, बटाटे, तसेच तूर डाळ, हरभरा डाळ, साखर, तेल, बेसनपीठ आदींचे भाव वाढल्याने मोठ्या खाणावळ चालकांनी धसका घेतला आहे. - अप्पा कदम, खाणावळचालक, नवी सांगवी