पाकच्या गोळीबारात महाराष्ट्रातील जवानाला वीरमरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2016 22:29 IST2016-11-06T20:11:26+5:302016-11-06T22:29:20+5:30

पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या गोळीबारात महाराष्ट्रातील अजून एक वीरपुत्र हुतात्मा झाला आहे.

Veeramaran in Maharashtra's Jail | पाकच्या गोळीबारात महाराष्ट्रातील जवानाला वीरमरण

पाकच्या गोळीबारात महाराष्ट्रातील जवानाला वीरमरण

ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. 6 - पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या गोळीबारात महाराष्ट्रातील अजून एक वीरपुत्र हुतात्मा झाला आहे. पाकिस्तानने रविवारी केलेल्या गोळीबारात कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यातील कार्वे गावचे जवान राजेंद्र तुपारे यांना वीरमरण आले आहे. 
तुपारे हे जम्मूमधील पुंछ विभागातील सब्जिया भागात तैनात होते. गेल्या दोन दिवसांपासून शांत असलेल्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने आज पुन्हा गोळीबारास सुरुवात केली. या गोळीबारास प्रत्युत्तर देताना तुपारे हे हुतात्मा झाले. दरम्यान, पाकच्या या गोळीबारात आज भारताचे दोन जवान हुतात्मा झाले.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गावावर शोककळा पसरली आहे. राजेंद्र यांना दोन मुलगे असून, ते 2002 साली बेळगाव येथील मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये रुजू झाले होते. 
बीएसएफकडून मिळत असलेल्या चोख प्रत्युत्तरानंतरही पाकिस्तानकडून होत असलेला गोळीबार  अद्याप थांबलेला नाही. आज सकाळी पुंछ जिल्ह्यातील मेंढर विभागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने पुन्हा गोळीबार केला. या गोळीबारात लष्कराचे दोन जवान शहीद झाले. दरम्यान, भारताने प्रत्युत्तरदाखल केलेल्या गोळीबारात पाकिस्तानच्या काही चौक्यांचे नुकसान झाले आहे. 
 

Web Title: Veeramaran in Maharashtra's Jail