करमाळ्याच्या जवानाला वीरमरण

By Admin | Updated: June 27, 2016 04:41 IST2016-06-27T04:41:06+5:302016-06-27T04:41:06+5:30

करमाळा तालुक्यातील कुंभेज येथील सुपुत्र आप्पासाहेब संभाजी काटे (वय ३९) यांना जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण आले.

Veeramaran of Karamala jawan | करमाळ्याच्या जवानाला वीरमरण

करमाळ्याच्या जवानाला वीरमरण


करमाळा (जि. सोलापूर) : भारतीय सेना दलात हवालदार पदावर कार्यरत असलेले करमाळा तालुक्यातील कुंभेज येथील सुपुत्र आप्पासाहेब संभाजी काटे (वय ३९) यांना जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण आले. बारामुल्ला येथील राजुरा सेक्टरमध्ये सैन्य दलास पॅराशूटचे प्रशिक्षण देत असताना शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. काटे हे १९९७मध्ये सेना दलात भरती झाले होते. त्यांनी इस्रायलमध्ये तीन वर्षे शांतीदूत म्हणून काम केले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले व लहान भाऊ असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव पहाटे कुंभेज येथे आणले जाणार असून, रविवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कर होणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Veeramaran of Karamala jawan