ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्रबुद्धे यांचे निधन
By Admin | Updated: June 30, 2016 00:53 IST2016-06-30T00:51:16+5:302016-06-30T00:53:38+5:30
ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्रबुद्धे ( वय77) यांचे निधन बुधवारी रात्री बाराच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले.

ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्रबुद्धे यांचे निधन
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 - ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्रबुद्धे ( वय77) यांचे निधन बुधवारी रात्री बाराच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पती, एक कन्या, एक मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे.
वीणाताईंचा जन्म 14 डिसेंबर 1948 रोजी कानपूर येथे झाला. पं. पलुस्कर परंपरातील पं. शंकरराव बोडस यांच्या त्या कन्या. संगीताचे मार्गदर्शन त्यांना पं. बोडस, बंधू काशिनाथ, तसेच पं बलवंतराय भट्ट, पं. वसंत ठकार, पं. गजाननबुवा जोशी यांच्याकडून मिळाले. कथक नृत्यही त्या शिकल्या होत्या. उत्तम मैफिल कलाकार तसेच अध्यापन, वाग्गेयकार म्हणूनही त्या लोकप्रिय होत्या. ख्याल, तराणा, ऋतुसंगीत आणि भजन ही त्यांची वैशिष्ट्ये होती. संगीत नाटक अकादमी सन्मानाने त्यांना गौरवण्यात आले होते.