शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Foxconn Vedanta Deal: "एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवण्याची किंमत गुजरातने वेदांत-फॉक्सकॉनच्या रूपाने वसूल केली"; राष्ट्रवादी काँग्रेसचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 18:04 IST

"मुख्यमंत्री शिंदे गुजरातसमोर लाचार, महाराष्ट्रात 'वेदांत-फॉक्सकॉन' टिकवता आले नाही"

Foxconn Vedanta Deal: वेदांत फॉक्सकॉनने महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये २० अब्ज डॉलरचा प्रकल्प उभारत असल्याचे समोर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) महाराष्ट्राचे हित साधत आहेत की गुजरातचे (Gujarat) हित साधत आहेत असा सवाल साऱ्यांच्या मनात असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. तसेच, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याची किंमत म्हणूनच वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्राबाहेर गेला, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. त्यासोबत, मुख्यमंत्री शिंदे गुजरातसमोर लाचार असून त्यामुळेच महाराष्ट्रात वेदांत फॉक्सकॉन त्यांना टिकवता आला नाही, असेही तपासे म्हणाले.

"महाराष्ट्रातील मागील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र राज्यात गुंतवणुकीसाठी वेदांत फॉक्सकॉनशी योग्य संवाद व चर्चा सुरू केली होती आणि तळेगावचे ठिकाण निश्चित करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारने स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने वेदांत फॉक्सकॉनला सर्वोत्तम प्राधान्य दिले होते. वेदांत फॉक्सकॉनसह व्यवसायाच्या संधीची वाट पाहणाऱ्या अनेक लहान उद्योजकांची साखळी त्यामुळे आता पूर्णपणे विस्कळीत झाली", असे महेश तपासे म्हणाले.

तरुणांचे रोजगार घालवल्याबद्दल स्पष्टीकरण द्या!

"नव्याने स्थापन झालेल्या 'ईडी' सरकारला महाराष्ट्रात वेदांत फॉक्सकॉन कायम ठेवता आले नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची राज्याच्या विकासाबाबतची उदासीन वृत्ती यात दिसून येते. त्यांनी गुजरातला बळी पडून महाराष्ट्राचे आर्थिक नुकसान आणि लाखो इच्छूक तरुणांचे रोजगार बुडवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील जनतेला आपल्या बंडाचे समर्थन करण्यात व्यस्त आहेत. रोजगार आणि औद्योगिकीकरणासारख्या विकासाच्या मुद्द्यांवर ते बोलत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला तरुणांचे रोजगार घालवल्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे", अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

टॅग्स :Foxconn Vedanta Dealवेदांता-फॉक्सकॉन डीलEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसGujaratगुजरात