वर्तक शाळांचा निकाल १००%
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:05+5:302016-06-07T07:43:05+5:30
लालोंडेच्या स्व. सौ. विद्या विनोद अधिकारी विद्यालय, बोईसरच्या डॉ. स. दा. वर्तक विद्यालय तिन्ही माध्यम व पास्थळ येथील ज्योतीदिप विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला

वर्तक शाळांचा निकाल १००%
बोइसर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत बोईसर पूर्व येथील लालोंडेच्या स्व. सौ. विद्या विनोद अधिकारी विद्यालय, बोईसरच्या डॉ. स. दा. वर्तक विद्यालय तिन्ही माध्यम व पास्थळ येथील ज्योतीदिप विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. स्व. सौ. विनोद अधिकारी विद्यालयातील रोशनी चं. पाटील ही विद्यार्थीनी ९०.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम तर उमेश प्र. रावते ९०.४० टक्के द्वितीय तर श्वेता वि. घरत व जयेश ल. भुतकडे या दोन विद्यार्थीनी ८९.४० टक्के गुण मिळवुन तृतीय आल्या असून या विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. विशेष म्हणजे या विद्यालयात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हे दुर्गम व ग्रामीण भागातील असून बारावी प्रमाणेच इयत्ता दहावीचा निकाल लागल्याने यशस्वी विद्यार्थी, शाळेतील शिक्षक व संस्था चालकांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
बोईसर एज्युकेशनच्या डॉ. स.दा. वर्तक विद्यालयाच्या मराठी हिंदी व इंग्रजी या तिन्ही माध्यमांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मराठी माध्यमातून श्रध्दा पाटील ९६.० टक्के प्रथम, नेहा जाधव व पूर्वा बारी ९४.६० द्वितीय, तर एकता संखे ९४ टक्के गुण मिळवुन तृतीय आली आहे. हिंदी माध्यमातून प्रीती चौधरी ९३.८० टक्के प्रथम, मोहिनी शर्मा ९०.८० द्वितीय, तर कृष्णकुमार यादव ८६.२० गुण मिळवून तृतीय आला आहे. इंग्रजी माध्यमातून पूजा सिंह ८१.८० टक्के प्रथम, सुशिला चौधरी ७२.४० टक्के द्वितीय तर प्रियंका कुशवाह ६९ टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे.
बोईसर मिलिट्री स्कृल (पास्थळ) मराठी माध्यमाचा निकाल ९८.१ टक्के लागला असून कुणाल झोपे ९३.६० टक्के प्रथम, अव्दैत दवणे ९३.२० द्वितीय तर स्विनल पाटील ९१.८० तृतीय तर याच शाळेच्या इंग्रजी माध्यमाचा ९८.८५ टक्के निकाल लागला असून सय्यदुल्ला खान ९१.२० टक्के प्रथम, दक्षिता राउत ८८.२० द्वितीय, तर निपुण दवणे ८७.८० टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे. ज्योतीदिप हिंदी महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असुन गौतम बिंदुलाल ८६.४० टक्के प्रथम, शुभम कुशवाह ८६.२० टक्के द्वितीय तर नीमा शर्मा ८४.२० टक्के गुण मिळवून तृतीय आले आहे. (वार्ताहर)
>डहाणूत १० वीचा निकाल ८७ %
डहाणू/बोर्डी : डहाणू तालुक्याचा निकाल ८७.५५ टक्के तर, फेर परीक्षा दिलेल्यांचा निकाल ५२.४९ टक्के लागला आहे. मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी डहाणू तालुक्यातील ४८ शाळांमधून एकूण ४३३७ पैकी ३७९७ परिक्षार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात २१३४ विद्यार्थी आणि १६६३ विद्यार्थीनींचा समावेश आहे. तर फेरपरीक्षा देणाऱ्या ९२४ पैकी ४८५ परिक्षार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात ३१० विद्यार्थी व १७५ विद्यार्थीनींचा समावेश आहे. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांच्या निकलांची तुलना केली असता , डहाणू सातव्या क्रमांकावर तर, अंतिम क्र मांकावर तलासरी आठव्या स्थानी आहे. दरम्यान अ. ज. म्हात्रे नरपड शाळेचा निकाल ९३.१८ टक्के लागला असून, विक्र ांत शामराव गांगुर्डे ८८.४० (प्रथम), उमांगी जयभारत कोदया ८६(द्वितीय), दियश देवेंद्र सुरती ८४ टक्के गुण मिळवून विद्यालयात तृतीय आला आहे.
> वसईतून जयदीप अष्टमकर पहिला
वसई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा पालघर जिल्ह्याचा निकाल ९२.७४ टक्के लागला असून वसई तालुक्याचा निकाल ९४.३१ टक्के एवढा लागला आहे. वसईतून विरारच्या उत्कर्ष विद्यामंदिर शाळेचा जयदीप अष्टमकर हा विद्यार्थी ९६.२० टक्के गुण मिळवून वसईतून पहिला आला आहे. पालघर जिल्ह्यातून परिक्षेसाठी ४३ हजार ८५९ इतके विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४० हजार ५८५ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात ९३.१७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ९२.३७ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.वसई तालुक्याचा निकाल ९४.३१ टक्के लागला आहे. यामध्ये ९३.६२ टक्के निकाल मुलांचा लागला असून ९५.११ टक्के निकालाने बाजी मारत मुलींनी यंदाही मुलांना मागे टाकले आहेत.
विरारच्या उत्कर्ष विद्यामंदिर शाळेचा जयदीप अष्टमकर हा विद्यार्थी ९६.२० टक्के गुण मिळवून वसईतून पहिला आला आहे. वसईतल्या ६३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यात वसईतल्या ३१, नालासोपा-यातल्या १७ आणि विरारच्या १५ शाळांचा समावेश आहे. तालुक्यातील २२९ शाळांतील २२ हजार ८८५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २१ हजार ५३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
>मोखाडा : संपूर्ण तालुक्याचा समाधानकारक निकाल लागला असुन मोखाडा कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल मध्ये अल्फिशा तय्यब शेख प्रथम, समीक्षा संतोष फापाळे ८७.६० टक्के मिळवत दुसरी आणि सुशांत संजय उरणे ८४.२० टक्के मिळवत तिसरा क्र मांक मिळवला आहे .