‘मतदार राजा’ जागा हो!
By Admin | Updated: October 12, 2014 00:51 IST2014-10-12T00:51:04+5:302014-10-12T00:51:04+5:30
प्रचाराची रणधुमाळी संपण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. यामुळे रविवारचा मुहूर्त साधत प्रचाराचा जोर आणखी वाढणार आहे.

‘मतदार राजा’ जागा हो!
>मुंबई : प्रचाराची रणधुमाळी संपण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. यामुळे रविवारचा मुहूर्त साधत प्रचाराचा जोर आणखी वाढणार आहे. पण या प्रचार रणधुमाळीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदार जनजागृतीने जोर पकडला आहे. मुंबईतील मतदार जागृती मोहिमेचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला असून, आता मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या व्हच्र्युल एज्युकेशन प्रणालीसाठी उपलब्ध असणा:या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सेवेचा वापर करून 15 हजार शिक्षकांना निवडणूक कार्यक्रम प्रशिक्षण देण्यात आले आहे. सुमारे 3 लाख 5क् हजार विद्याथ्र्यामार्फत त्यांच्या पालकांर्पयत मतदार जागृतीची संदेश पोहोचवला आहे.
मतदार जागृती मोहिमेंतर्गत युवकांर्पयत पोहोचता यावे
म्हणून महाविद्यालयीन स्तरावरही विविध कार्यक्रम आयोजित
करण्यात आले होते. या अंतर्गत
4क्क् महाविद्यालय समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मतदनीस अशा 18क्क् कार्यकत्र्याच्या माध्यमातून प्रत्येकी 15क् घरे याप्रमाणो 5 लाख मतदारार्पयत संपर्क साधण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
हाऊसिंग सोसायटय़ांमध्येही जनजागृती करण्यात येत असून, आतार्पयत 6 हजार सोसायटी स्तरावर संपर्क साधण्यात आला आहे. यासाठी सहकार सचिवांमार्फत सर्व सोसायटय़ांचे अध्यक्ष व सचिव यांना पत्रेही पाठविण्यात आली आहेत. उच्चभ्रू परिसरात मतदार जागृती विषयक पोस्टर्स लावण्यात येत आहेत. मध्यमवर्गीय लोकवस्ती, चाळ, झोपडपट्टी अशा सर्व स्तरावर विविध प्रकारे मतदार जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये पथनाटय़, नुक्कड सभा, चर्चात्मक कार्यक्रम, मेळावे, जाहिरात पट व प्रत्यक्ष संपर्क यांचा समावेश आहे.
सेविकांमार्फत घरोघरी संपर्क
महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत 7क्क् आरोग्य सेविकांमार्फत प्रत्येकी 25क् घरे याप्रमाणो संपर्क साधण्यात येत आहे. मतदार यादीत नाव असणा:या सर्व मतदारांनी 15 ऑक्टोबर रोजी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, तसेच आपले मत हे अमूल्य आहे याची जाणीव ठेवून कुठल्याही प्रलोभनाला किंवा गैरवाजवी प्रभावाला बळी न पडता विवेकपूर्ण मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.