शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पुरस्कारांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 02:28 IST

शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वाटप

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप कालावधी वाढविण्यासाठी शुगर बीट उपयुक्त असून शेतकऱ्यांना व कारखानदारांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच साखरेच्या उत्पादनात वाढ होणार असून, इथेनॉल निर्मितीचे प्रमाणही वाढणार आहे. याबाबतचे सादरीकरण येत्या १५ डिसेंबर रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेत करण्यात येणार आहे. तसेच साखर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया शेतकरी व कारखानदारांना पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे, असे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले.वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे दिल्या जाणाºया विविध पुरस्कारांची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते. शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक विकास देशमुख उपस्थित होते. २०१७-१८ या गळीत हंगामात जास्तीत जास्त उसाचे उत्पादन काढणाºया शेतकºयांना ऊस भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. ऊस भूषण पुरस्कारासाठी दक्षिण विभागात सांगलीतील शोभ चव्हाण या शेतकºयाची आणि राजारामबापू पाटील साखर कारखान्याची तसेच कोल्हापुरातील मोहन चकोते या शेतकºयाची आणि सांगलीतील दत्त शेतकरी साखर कारखान्याची आणि दत्तात्रय चव्हाण व डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याची निवड करण्यात आली आहे.मध्य विभागासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिवाजी पाटील व तानाजी पवार या शेतकºयांची आणि सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना निवडला आहे.तर पुणे जिल्ह्यातील प्रकाश ढोरे या शेतकºयाची आणि संत तुकाराम साखर कारखान्याची निवड करण्यात आली आहे. तसेच उत्तरपूर्व विभागातून लातूर जिल्ह्यातील वैशाली विलासराव देशमुख आणि विलास सहकारी साखर कारखान्याची आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील रविकिरण भोसले या शेतकरी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना निवडला आहे.राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्काराचे मानकरीराज्यस्तरीय कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कारासाठी कोल्हापुरातील चवगोंडा आण्णा पाटील या शेतकºयाची व दत्त शेतकरी साखर कारखान्याची निवड केली आहे. तर कै. वसंतराव नाईक पुरस्कारासाठी सातारा जिल्ह्यातील सौरभ विनयकुमार कोकिळ या शेतकºयाची आणि जयवंत शुगर्सची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे कै. आण्णासाहेब शिंदे पुरस्कारासाठी मारूती शिंदे या शेतकºयाची व तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याची निवड करण्यात आली आहे.विभागवार तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार :दक्षिण विभागप्रथम क्रमांक : उदगिरी शुगर अ‍ॅण्ड पॉवर लि. ता. खानापूर, जि. सातारा,द्वितीय क्रमांक : कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना, ता. करवीर,तृतीय क्रमांक : क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू, लाड साखर कारखाना,ता. पलूसमध्य विभागप्रथम क्रमांक : श्री अंबिका शुखर प्रा. लि. ता. कर्जतद्वितीय क्रमांक : अगस्ती साखर कारखाना, ता. अकोलेतृतीय क्रमांक : सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना, ता. माळशिरसउत्तर पूर्व विभागप्रथम क्रमांक : विलासराव देशमुख मांजरा शेतकरी साखर कारखाना, ता. लातूरद्वितीय क्रमांक : विलास साखर कारखाना, निवळी, लातूरतृतीय क्रमांक : बारामती अ‍ॅग्रो लि. ता. कन्नड, जि. औरंगाबादउत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कारदक्षिण विभाग : छत्रपती शाहू साखर कारखाना, ता. कागलमध्य विभाग : नीरा भीमा साखर कारखाना, ता. इंदापूरउत्तरपूर्व विभाग : रेणा साखर कारखाना, ता. रेणापूरकै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार :रेणा साखर कारखाना, ता. रेणापूर, जि. लातूर.कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवणीपुरस्कार :दौंड शुगर प्रा.लि.कै. आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार : पतंगराव कदम सोनहिरा कारखाना, ता. केडगाव, जि. सांगली.कर्मयोगी शंकरराव पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार : डॉ.डी.जी.बापू लाड साखर कारखानासा.रे.पाटील सर्वोकृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार : विघ्नहर साखर कारखाना, ता. जुन्नरवैयक्तिकपुरस्कारांची यादीउत्कृष्ट मुख्य शेती अधिकारी : संभाजी पांडुरंग थिटेउत्कृष्ट पर्यावरण अधिकारी : आर. के. गोफणेउत्कृष्ट चीफ इंजिनिअर : गजेंद्र गिरमेउत्कृष्ट चीफ केमिस्ट :संजय साळवेउत्कृष्ट चीफ अकाऊंटंट : अमोल अशोकराव पाटीलउत्कृष्ट आसवाणी व्यवस्थापक :धैर्यशील रणवरेउत्कृष्ट कार्यकारी संचालक : राजेंद्रकुमार रणवरेउत्कृष्ट कामगिरी केलेले कर्मचारी : राजेंद्र चांदगुडे, संतोष वाघमारे, सिकंदर शेखविलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार : छत्रपती शाहू साखर कारखाना

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेPuneपुणे