वसईची सौंदर्यवती अंतिम फेरीत

By Admin | Updated: March 5, 2016 01:04 IST2016-03-05T01:04:54+5:302016-03-05T01:04:54+5:30

वसईतील अल्विरा शानल फर्नांडीस या तरुणीने मिसेस ग्लोबल इंडिया-१०२६ च्या अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे. गोवा येथे ९ मार्चपासून होणाऱ्या या स्पर्धेत अल्विरा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Vasai's beauty is in the final round | वसईची सौंदर्यवती अंतिम फेरीत

वसईची सौंदर्यवती अंतिम फेरीत

वसई : वसईतील अल्विरा शानल फर्नांडीस या तरुणीने मिसेस ग्लोबल इंडिया-१०२६ च्या अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे. गोवा येथे ९ मार्चपासून होणाऱ्या या स्पर्धेत अल्विरा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
गोवा येथे स्पर्धेची अंतिम फेरी होत असून त्यामध्ये मिसेस ग्लोबल इंडिया स्पर्धेत पंधरा जणींची निवड करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातून अल्विराची निवड करण्यात आली आहे.
एकूण पाच फेरीमध्ये ही स्पर्धा होणार आहे. पहिल्या फेरीत अल्विरा महाराष्ट्रीयन नऊवारी साडी नेसून महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. एका परदेशी कंपनीत सेल्स मॅनेजर पदावर काम करणाऱ्या अल्विराने आपल्या वाटचालीत नवरा शानलचे पाठबळ मोलाचे असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Vasai's beauty is in the final round