शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

वसई परिवहन प्रवास महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2016 02:18 IST

विरार पालिकेने परिवहन सेवेच्या तिकीटात दरवाढ करून प्रवाशांवर आर्थिक बोजा टाकला

वसई : विरार पालिकेने परिवहन सेवेच्या तिकीटात दरवाढ करून प्रवाशांवर आर्थिक बोजा टाकला. परिवहन सेवेच्या भाड्यात वाढ सुचवणारा प्रस्ताव महासभेत संमत करण्यात आला आहे. २०१२ पासून वसई विरार महापालिकेने स्वतची परिवहन सेवा सुरू केलेली आहे. या परिवहन सेवेचे कंत्राट मे. भगिरथी ट्रान्स कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. पालिकेच्या ताफ्यात सध्या १४९ बसेस आहेत. त्यापैकी कंत्राटदाराच्या ३० आणि पालिकेच्या ११९ बसेसचा समावेश आहे. पालिकेने परिवहन सेवेच्या भाड्यात वाढ सुचवली होती. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने त्याला मंजुरी दिल्यानंतर महासभेत दरवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला महासभेने मंजुरी दिली आहे. या नव्या दरवाढीनुसार दोन किलोमीटर ते १४ किलोमीटरसाठी दोन ते पाच रूपये दरवाढ मंजूर करण्यात आली आहे. पहिल्या दोन किलोमीटरसाठी एक रूपया कमी करण्यात आला आहे. १२ किलोमीटरच्या पुढे दरवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे वसई विरार शहरातील अंतर्गत प्रवास महागला आहे. त्याचवेळी अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या वाहन भत्त्यात वाढ करून महासभेने पालिकेच्या तिजोरीवर बोजा टाकला. आता सर्वपक्षीय नगरसेवकांनी मानधन वाढवण्याचा आग्रह धरला असून पुढच्या महासभेत हा विषय येण्याचा शक्यता आहे. पालिकेची स्थापना झाल्यापासून नगरसेवकांचे मानधन वाढवण्यात आलेले नाही. ड वर्ग महापालिकेचे आता क वर्गात रुपांतर झाले असून मानधनातही वाढ व्हायला हवी, असे शिवसेनेच्या नगरसेविका किरण चेंदवणकर यांनी महासभेत सांगितले. तर स्थायी समिती सभापती नितीन राऊत यांनीही नगरसेवकांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी केली. तर नगरसेवक अजीव पाटील यांनी मुख्यालयापासून दूर रहात असलेल्या नगरसेवकांचे मानधन वाढले पाहिजे, असा आग्रह धरला होता. त्यावर बोलताना उपमहापौर उमेश नाईक यांनी नगरसेवकांच्या मानधनाबाबत आयुक्त पुढच्या महासभेत नक्कीच प्रस्ताव आणतील असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे वसई विरार पालिकेच्या नगरसेवकांचे मानधन वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. दुसरीकडे, महापालिकेने अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या वाहन भत्त्यात मोठी वाढ केली आहे. आयुक्त सतीश लोखंडे यांनी वाहन भत्ता वाढीचा आणलेला प्रस्ताव महासभेत सर्वानुमते संमत करण्यात आला. (प्रतिनिधी)महापालिकेची आर्थिक स्थिती कठीणसध्या पालिकेची आर्थिक स्थिती कठीण बनत चालली आहे. ठेकेदारांची बिले मोठ्या प्रमाणावर थकलेली आहेत. लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी मोठ-मोठी कामे केली. मात्र, त्यातील अनेक कामांची किमान सत्तर कोटींहून अधिक रकमेची बिले थकल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. तिजोरीत पैसे कमी असल्याने ठेकेदारांना टप्याटप्याने बिले अदा केली जात आहेत. अनेक ठेकेदारांची अनामत आणि इसारा रक्कमही निधीअभावी रखडून पडली आहे. तिजोरीत खडखडाट असल्याने नगरसेवकांना मोजकीच कामे सुचवण्याचे सल्ले अधिकाऱ्यांकडून दिले जात आहेत. नवीन कामांना मंजुरी देताना महत्वाच्या कामांना प्राधान्य देण्यावर भर दिला जात आहे. तरी भत्तेवाढ झाली व मानधनवाढ प्रस्तावित आहे.