ऑनलाइन लोकमत
वसई, दि. १७ - भुईगाव येथील वादग्रस्त आशीर्वाद प्रार्थना केंद्राचे प्रमुख संचालक पास्टर सेबेस्टीन मार्टिन (58) यांचे आज सकाळी त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
प्रार्थना केंद्रात प्रार्थनेच्या नावाखाली बुवाबाजी चालत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी मार्टिन सह त्यांच्या 3 सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. तसेच प्रांताधिकार्यानी केंद्र बंदही केले होते.
याविरोधात मार्टिन समर्थकांनी मोर्चा कडून केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती.
तीन महिन्यापूर्वी केंद्र सुरू झाले होते. पण मार्टिन डायबिटीस व ब्लडप्रेशर मुळे आजारी असल्याने केंद्रात येत नव्हते. अखेर आज सकाळी त्यांचे निधन झाले. आज दुपारी साडेचार वाजता भुईगाव चर्चमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.