गणपत्ती बाप्पाला निरोप देण्यासाठी वरुणराजाची हजेरी

By Admin | Updated: September 15, 2016 08:39 IST2016-09-15T08:39:11+5:302016-09-15T08:39:11+5:30

संपुर्ण महाराष्ट्र विसर्जनासाठी सज्ज झाला असून गेले कित्येक आठवडे दडी मारलेल्या वरुणराजानेदेखील बाप्पाला निरोप देण्यासाठी हजेरी लावली आहे

Varunaraja's attendance to be sent to Ganapati Bappa | गणपत्ती बाप्पाला निरोप देण्यासाठी वरुणराजाची हजेरी

गणपत्ती बाप्पाला निरोप देण्यासाठी वरुणराजाची हजेरी

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - सर्वांचा लाडक्या गणपती बाप्पाचं आज विसर्जन होणार आहे. संपुर्ण महाराष्ट्र विसर्जनासाठी सज्ज झाला असून गेले कित्येक आठवडे दडी मारलेल्या वरुणराजानेदेखील बाप्पाला निरोप देण्यासाठी हजेरी लावली आहे. मुंबईसह पुणे, सोलपूरात सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत वरळी, दादर, परेल परिसरात सकाळी मुसळधार पाऊस सुरु होता. 
 
मुंबई, पुणे आणि सोलापूरसह राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विसर्जन मिरवणुकांवर पावसाचं सावट निर्माण झालं असल्याने भक्त मात्र नाराज झालेले दिसत आहेत. गपणती बाप्पाचं विसर्जन म्हणजे उत्साहाला आलेलं उधाण, मात्र त्यात पाऊस पडला तर चिखल होईल ज्यामुळे भक्तांना घाई गडबडीत विसर्जन करावं लागेल. 
 

Web Title: Varunaraja's attendance to be sent to Ganapati Bappa