औरंगाबादेत भाजपाच्या मोर्चावर वरुणराजा बरसला!
By Admin | Updated: August 23, 2014 00:26 IST2014-08-23T00:26:44+5:302014-08-23T00:26:44+5:30
मराठवाडय़ात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी भारतीय जनता पार्टीतर्फे (भाजपा) क्रांतीचौकातून मोर्चा काढण्यात आला.

औरंगाबादेत भाजपाच्या मोर्चावर वरुणराजा बरसला!
औरंगाबाद : मराठवाडय़ात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी भारतीय जनता पार्टीतर्फे (भाजपा) क्रांतीचौकातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चा अध्र्या किलोमीटरवर गेल्यानंतर पैठणगेट येथे पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी आसपासच्या दुकानांमध्ये आश्रय घेतला. पाऊस थांबतच नसल्याने भाजपा नेत्यांनी नंतर विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पंकजा पालवे उपस्थित होते. क्रांती चौकातून निघालेल्या मोर्चात उघडय़ा जीपमध्ये सर्व नेतेमंडळी सहभागी नागरिकांसह पुढे सरकत होती. पैठणगेट येथे मोर्चा पोहोचताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे धावपळ झाली. मागण्यांचे निवेदन आयुक्तांना दिल़े (प्रतिनिधी)