वर्षा लोखंडे यांचे निधन

By Admin | Updated: September 22, 2016 03:42 IST2016-09-22T03:42:42+5:302016-09-22T03:42:42+5:30

मराठी व हिंदीच्या गाढ्या अभ्यासिका व महिला महाविद्यालयातील प्राध्यापिका वर्षा लोखंडे यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले.

Varsha Lokhande passed away | वर्षा लोखंडे यांचे निधन

वर्षा लोखंडे यांचे निधन


डोंबिवली : मराठी व हिंदीच्या गाढ्या अभ्यासिका व महिला महाविद्यालयातील प्राध्यापिका वर्षा लोखंडे यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले.गेल्या काही वर्षांपासून महिला महाविद्यालयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीला त्या कै. ताराबाई रामकृष्ण पाटील पुरस्कार देत होत्या. सर्व क्षेत्रांतील त्यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय होते. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले. अनेकांच्या त्या आधारस्तंभ होत्या. साधी राहणी व उच्च विचारसरणी, अशा पद्धतीने त्या जीवन जगल्या. संजीवनी मधुमेह क्लब व आश्रय चॅरिटेबल ट्रस्टसाठी त्या काम करीत होत्या. अनेक मधुमेहींच्या जीवनात आनंद फुलवण्याचे त्यांनी काम केले होते. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीने सामना केला. शरीराने साथ दिली नाही, तरी शेवटपर्यंत त्यांची बुद्धिमत्ता तीक्ष्ण होती. त्यांच्या पश्चात पती राम लोखंडे आहेत.

Web Title: Varsha Lokhande passed away