‘वारणा’च्या पाण्याची शहरात घुसखोरी!

By Admin | Updated: July 4, 2016 03:32 IST2016-07-04T03:32:24+5:302016-07-04T03:32:24+5:30

चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने भिवंडीला झोडपून काढले

'Varna' water infiltration in the water! | ‘वारणा’च्या पाण्याची शहरात घुसखोरी!

‘वारणा’च्या पाण्याची शहरात घुसखोरी!


चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने भिवंडीला झोडपून काढले असून खाडीचे पाणी शहरात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे वाडा रोडवरील कामवारी नदी व वसई रोडवरील वारणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. या दोन्ही नद्यांचे पाणी खाडीतून समुद्रास मिळते. परंतु, भरतीच्या वेळी ते पाणी शहरात घुसल्याने ईदगाह रोड, अजयनगर, आदर्श पार्क, शिवाजीनगर, तीनबत्ती आदी भागांत रस्त्यांवर पाणी साचले होते.
शहापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत शेणवा येथील विलास अण्णा पडवळ यांच्या घराची भिंत कोसळण्याची घटना रविवारी पहाटे १.३० च्या सुमारास घडली असून जीवितहानी झाली नाही. २४ तासांपासून मुसळधार पावसाने तालुक्याला झोडपले आहे.
जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही पाऊस मुसळधार बरसला आहे. माळशेज घाटात पर्यटकांची गर्दी उसळली आहे. अधिक वृत्त/छायाचित्र - २

Web Title: 'Varna' water infiltration in the water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.