विविध विकासकामांचा आज होणार शुभारंभ
By Admin | Updated: June 9, 2016 03:31 IST2016-06-09T03:31:18+5:302016-06-09T03:31:18+5:30
टोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा ९ जून रोजी पार पडणार आहे.

विविध विकासकामांचा आज होणार शुभारंभ
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा ९ जून रोजी पार पडणार आहे. रायगड जिल्हा परिषद, नेरळ विकास प्राधिकरण आणि नेरळ ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा होणार आहे. याप्रसंगी कर्जतचे आमदार सुरेश लाड, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, कर्जत पंचायत समिती सभापती सुवर्णा बांगारे, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य सुदाम पेमारे, पूजा थोरवे, एकनाथ धुळे, नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा नाईक यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सकाळी १०.३० वा. राजमाता जिजाऊ भोसले तलावाच्या सुशोभीकरण कामाचे लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. कुंभार आळी व दगडी शाळा नवीन इमारतीचे भूमिपूजन स. १०.४५ वा. मटण व मच्छिमार्केट नूतनीकरण स. ११ वा. टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या कार्यालयाचे भूमिपूजन, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमिपूजन, अवजड वाहने नेरळच्या बाहेरून जाण्यासाठी विविध रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे नूतनीकरण, नेरळ कन्या शाळेच्या चार खोल्यांच्या इमारतीचे भूमिपूजन, विश्रामगृहासह व्यापारी संकुल इमारतीचे भूमिपूजन असे भरगच्च कार्यक्रम पार पडणार आहेत. या विविध विकासकामांमुळे नेरळमध्ये विकासाची गंगा अवतरल्याची अनुभूती होणार आहे. (प्रतिनिधी)