वाळूचोरीप्रकरणी ३७ जणांविरुद्ध गुन्हे, ९ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:00 IST2017-08-06T00:00:47+5:302017-08-06T00:00:51+5:30
सिद्धापूर येथील भीमा नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळूची चोरी करून, पर्यावरणाचा ºहास केल्याप्रकरणी ३७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी ९ जणांना पोलिसांनी

वाळूचोरीप्रकरणी ३७ जणांविरुद्ध गुन्हे, ९ जणांना अटक
मंगळवेढा (जि. सोलापूर) : सिद्धापूर येथील भीमा नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळूची चोरी करून, पर्यावरणाचा ºहास केल्याप्रकरणी ३७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी ९ जणांना पोलिसांनी अटक केली असून, इतर २८ जण फरार आहेत़
भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा प्रकरणी भागवत यशवंत सांगोलकर, यलगोंडा उपेंद्र कुंभार, संजयकुमार बसवराज अडाळी, अमोल विलास मुंगसे, चन्नाप्पा शिवाप्पा भरमगोंड, अमोल चंद्रकांत कोळी, प्रशांत गणपती पाटील, शिवाजी तानाजी चव्हाण, ज्ञानेश्वर शिवाप्पा निमंगरे अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. २ कोटी ४७ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता.