शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीपेक्षा वाराणशीची अवस्था वाईट - संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 06:00 IST

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी आपले गाव, शहर आणि मतदारसंघाच्या विकासापुरते पाहू नये. त्यांचा मतदारसंघ म्हणजे देश नाही. पंतप्रधानाच्या वाराणशी मतदारसंघाची अवस्था डोंबिवलीपेक्षा अत्यंत वाईट आहे. म्हणून तर तेथे प्रचंड खर्च करून कामे सुरू आहेत, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला.

डोंबिवली - पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी आपले गाव, शहर आणि मतदारसंघाच्या विकासापुरते पाहू नये. त्यांचा मतदारसंघ म्हणजे देश नाही. पंतप्रधानाच्या वाराणशी मतदारसंघाची अवस्था डोंबिवलीपेक्षा अत्यंत वाईट आहे. म्हणून तर तेथे प्रचंड खर्च करून कामे सुरू आहेत, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला.भाजपाने कितीही आवाहन केले, तरी युती होणार नसल्याचा पुनरूच्चार करून सध्या महाराष्ट्राला निवडणुका परवडणाऱ्या नसल्याने शिवसेनेने सरकारचा टेकू काढलेला नाही, असा युक्तिवादही त्यांनी केला.डोंबिवली पत्रकार संघाच्या अनौपचारिक गप्पांवेळी ते बोलत होते. गेल्याच महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवली हे अत्यंत घाणेरडे शहर असल्याचे वक्तव्य केले होते. ते विचारता खासदार राऊत यांनी वस्तुस्थिती मांडत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघावरच निशाणा साधला. गडकरी यांनी जरी डोंबिवलीविषयी विधान केले असले तरी नागपूरची अवस्था काय होती? युती सरकारच्या काळात गडकरी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झाल्यानंतरच नागपूरचा विकास होत गेला. आताही मुख्यमंत्र्यांचे जास्त लक्ष नागपूरवर आहे. सध्याचे मुख्यमंत्री काय किंवा विलासराव देशमुख काय, त्यांनी त्यांच्या मतदारसंघात विकासकामे खेचून नेली. त्याला पंतप्रधानही अपवाद नाहीत. ते वाराणसी मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्या मतदारसंघाची अवस्था डोंबिवलीपेक्षा वाईट आहे. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. पण वाराणशी म्हणजे देश नाही, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले. राजीव गांधी यांनीही त्यांच्या काळात त्यांचा मतदारसंघ अमेठीवर जास्त लक्ष दिले. पंतप्रधान, मुख्यमंत्री हे केवळ त्याचा मतदारसंघ, गाव आणि शहराचे नसतात. ते देशाचे, राज्याचे असतात, असा चिमटा काढला.‘बेटी बचाव हा इशारा’दिल्लीतल निर्भया बलात्कार प्रकरणाच्या वेळी भाजपाची जी भूमिका होती. ती आत्ता उत्तर प्रदेश आणि काश्मीर बलात्कार प्रकरणावेळी बदलेली दिसते. ‘बेटी बचाव’ हा कार्यक्रम राहिलेला नसून तो धोक्याचा इशारा (वॉर्निंग) झालेला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्नजातीय व धार्मिक तेढ निर्माण करुन निवडणुका जिंकण्याचा घाट भाजपाकडून घातला जात आहे. देशात अराजक निर्माण करण्याची सुरुवात झाली आहे. आजवर महाराष्ट्र कधी जातीच्या मुद्द्यावर फाटला नव्हता. पण भीमा-कोरेगावच्या प्रकरणामुळे फाटलेला महाराष्ट्र अद्याप शिवला गेलेला नाही. त्यामुळेच जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणाºया शक्तींना चिरडून टाकले पाहिजे, असे आवाहन राऊत यांनी केले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा