वंदना खरे आणि संतोष जुवेकर यांच्यात जुंपली!

By Admin | Updated: April 20, 2015 08:33 IST2015-04-20T02:40:46+5:302015-04-20T08:33:41+5:30

साहित्यिक वंदना खरे यांनी मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकरने दादागिरी केल्याचे म्हटले आहे. नाटकाच्या तालमीवरून झालेल्या

Vandana Khare and Santosh Juvekar jumped! | वंदना खरे आणि संतोष जुवेकर यांच्यात जुंपली!

वंदना खरे आणि संतोष जुवेकर यांच्यात जुंपली!

मुंबई : साहित्यिक वंदना खरे यांनी मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकरने दादागिरी केल्याचे म्हटले आहे. नाटकाच्या तालमीवरून झालेल्या वादाविषयी वंदना खरे यांनी फेसबुकच्या वॉलवर स्टेट्स पोस्ट करून संतोषच्या वागणुकीबद्दल खंत व्यक्त केली आहे.
यशवंत नाट्य संकुलात एकाच वेळी दोन तालमी सुरू होत्या. त्या वेळी संतोष जुवेकर आणि त्याच्यासोबत असलेल्या कलाकारांच्या गप्पा आणि हशामुळे तालमीमध्ये व्यत्यय येत होता. मात्र याविषयी तक्रार न करता खरे यांनी दार बंद केले. त्यानंतर संतोषने ‘आम्हाला हवा पाहिजे’ असे सांगत थेट दार उघडले. परंतु, गप्पांच्या वाढत्या आवाजाने त्रास होत असल्याचे सांगितले, तेव्हा संतोषने ‘एवढा माज असेल तर ए.सी. हॉलमध्ये जा ना!’ असे धक्कादायक प्रत्युत्तर दिले.
नाटक-सिनेमांच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेले लोक इतरांवर दादागिरी करणे हा आपला हक्क समजतात. पण इतक्या अनुभवी कलाकारांकडून अशी वागणूक घडावी याचा खेद वाटतो, असे खरे म्हणाल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Vandana Khare and Santosh Juvekar jumped!