मतदानावरून महिलेला पेटविले
By Admin | Updated: October 18, 2014 02:05 IST2014-10-18T02:05:37+5:302014-10-18T02:05:37+5:30
विशिष्ट उमेदवाराला मतदान न केल्याच्या रागातून तिघांनी एका वृद्ध महिलेला पेटविल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री येवला तालुक्यातील बाभुळगाव खुर्द येथे घडली.

मतदानावरून महिलेला पेटविले
येवला (नाशिक) : विधानसभा निवडणुकीत विशिष्ट उमेदवाराला मतदान न केल्याच्या रागातून तिघांनी एका वृद्ध महिलेला पेटविल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री येवला तालुक्यातील बाभुळगाव खुर्द येथे घडली. 6क् टक्के भाजलेली ही वृद्ध महिला जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
येवला पोलिसांनी तिघांना अटक केली असून, न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. येवला शहरापासून दीड किलोमीटर अंतरावरील येवला-मनमाड रस्त्यालगत बाभुळगाव खुर्द येथील ङोलूबाई जगन्नाथ वाबळे (65, रा. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर) बुधवारी (दि. 15) मतदान करण्यासाठी जात होत्या. त्या वेळी अशोक सोपान बोरनारे, पांडुरंग सोपान बोरनारे, नंदकिशोर विश्वनाथ भुरूक यांनी ङोलूबाई यांना तिस:या क्रमांकाचे बटन (धनुष्याचे) दाबून मतदान करावे, असे सांगितले. परंतु त्यांनी दुस:या क्रमांकाचे (घडय़ाळ) बटन दाबल्याचे या तिघांना समजल्यानंतर त्यांनी ङोलूबाई यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. (वार्ताहर)