शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वंचितने उमेदवार बदलला! शेतकऱ्यांच्या भविष्यवेत्त्याला उमेदवारी; पंजाबराव डख यांनी अर्ज भरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 16:20 IST

VBA Panjabrao Dakh: गेल्या काही दिवसांत वंचितने तिसरा उमेदवार बदलला आहे. काही दिवसांपूर्वी परभणीतून प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेब उगले यांना उमेदवारी दिली होती.

महाराष्ट्रात जी दोन आघाडी-युतीमध्ये थेट लढत होणार होती काही मतदारसंघांत तिला त्रिशंकू करणाऱ्या वंचित आघाडीने काही दिवसांपूर्वी मविआला धक्का देत उमेदवार यादी जाहीर केली होती. यापैकी एक उमेदवार बदलला आहे. अनेक ठिकाणी विविध पक्ष आपले उमेदवार मागे घेऊन नवीन उमेदवार देत आहेत. अशातच वंचितने परभणी मतदारसंघातील उमेदवार बदलला आहे. 

गेल्या काही दिवसांत वंचितने तिसरा उमेदवार बदलला आहे. काही दिवसांपूर्वी परभणीतून प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेब उगले यांना उमेदवारी दिली होती. परंतु उगलेंची उमेदवारी बदलून वंचितने हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांना उमेदवारी दिली आहे. आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. 

काही दिवसांपूर्वी डख हे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. आता परभणीमध्ये त्रिशंकु लढत होणार आहे. महायुतीने परभणीतून महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने संजय उर्फ बंडू जाधव यांना रिंगणात उतरविलेले आहे. 

वंचितमध्ये कोण कोण बदलले...वंचितने आतापर्यंत १९ मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले आहेत. यापैकी तीन उमेदवार बदलण्यात आले आहेत. रामटेकच्या उमेदवाराने तांत्रिक कारण सांगत माघार घेत काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सुभाष चव्हाण या उमेदवाराला बदलून अभिजित राठोड यांना उमेदवारी दिली आहे. 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४parbhani-pcपरभणी