मूल्यव्यवस्था हाच समाजव्यवस्थेचा आधार
By Admin | Updated: August 22, 2015 23:29 IST2015-08-22T23:29:25+5:302015-08-22T23:29:25+5:30
समाजव्यवस्थेत अनेक उपव्यवस्था असतात़ या सर्वांचा आधार मूल्यव्यवस्था आहे़ मूल्यांचा ऱ्हास झाला तर व्यवस्था कोलमडून जाईल, असे मत ज्येष्ठ तत्वज्ञ डॉ़ सदानंद मोरे

मूल्यव्यवस्था हाच समाजव्यवस्थेचा आधार
अहमदनगर : समाजव्यवस्थेत अनेक उपव्यवस्था असतात़ या सर्वांचा आधार मूल्यव्यवस्था आहे़ मूल्यांचा ऱ्हास झाला तर व्यवस्था कोलमडून जाईल, असे मत ज्येष्ठ तत्वज्ञ डॉ़ सदानंद मोरे यांनी व्यक्त केले़ न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात तत्वज्ञान विभागाच्यावतीने ‘मानवी मूल्य आणि आधुनिक समाज’या विषयावर शुक्रवारी आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ मोरे म्हणाले की,मानवी इतिहासाचा मूल्यात्मक आढावा घेताना इतिहासाचा प्रत्येक टप्पा हा मूल्यसंघर्षच होता़ मूल्य ही मानवनिर्मित आहेत़ ते दैवी नाहीत़ मूल्यसंघर्ष हा मानवी जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे़ यातूनच नवीन मूल्य निर्माण होत असतात़ काही मूल्यामध्ये बदल हवा असतो़ तर काहींना हा बदल नको असतो़ मूल्य मात्र, कधी संपत नाहीत़ मूल्यविरहीत समाज असूच शकत नाही़ मूल्य व्यवस्था ढासळली तर समाजव्यवस्था धोक्यात येईल असे ते म्हणाले़
प्राचार्य डॉ़ बी़एच़ झावरे यांनी विज्ञान व मूल्यव्यवस्था यांनी हातात हात घालून काम केले तर मानवी जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल असे सांगितले़ सीताराम खिलारी म्हणाले, जीवन जगत असताना आपण बरोबर की, चूक हे ठरवताना मूल्य हीच मोजपट्टी आहे़
प्रत्येकाने मूल्य संभाळून व्यवहार केला तर समाज व्यवस्थित राहिल़ तत्वज्ञान विभागप्रमुख प्रा़ अमन बगाडे यांनी प्रास्ताविक केले़
या चर्चासत्रात हैद्राबाद विद्यापीठातील प्रा़ वेंकट रेड्डी, बनारस विद्यापीठाचे तत्वज्ञान विभागप्रमुख डॉ़ प्रदीप गोखले यांनी आपल्या विषयांचे सादरीकरण केले़ शनिवारी डॉ़ पेन्ना मधुसूदन, डॉ़ हेमा मोरे, डॉ़ लता चित्रे, डॉ़विजय कांची, डॉ़ शुभदा जोशी, डॉ़ ज़रा़ दाभोळकर व डॉ़ राहुल वर्मा हे विचार व्यक्त करणार आहेत़
यावेळी प्रा़ सुभाष कडलग, प्रा़ काशीद, प्रा़ मीना साळे, प्रा़ अशोक चोथे,डॉ़ बाळासाहेब सागडे, डॉ़ जयश्री आहेर, प्रा़ नागेश शेळके, डॉ़ पी़टी़ शेळके, डॉ़ बी़डी़ उंदरे, डॉ़ बाळासाहेब पवार, प्रा़ गणेश भगत आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)