'व्हेलेंटाईन डे'ला कंडोमच्या विक्रीत लक्षणीय वाढ
By Admin | Updated: February 14, 2017 16:29 IST2017-02-14T15:49:00+5:302017-02-14T16:29:31+5:30
प्रत्येक वर्षी प्रेमोत्सव व्हेलेंनटाईन डेनिमित्त केवळ भेटवस्तूच नाही तर या काळात कंडोमच्या विक्रीमध्येही लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळते.

'व्हेलेंटाईन डे'ला कंडोमच्या विक्रीत लक्षणीय वाढ
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 14 - प्रत्येक वर्षी प्रेमोत्सव व्हेलेंनटाईन डेनिमित्त टेडी बिअर, हृदयाचे आकार असलेल्या उशा, चॉकलेट, गुलाबाचे फूल यासारख्या भेटवस्तूंची विक्री-खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. केवळ भेटवस्तूच नाही तर या काळात कंडोमच्या विक्रीमध्येही लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळते.
या प्रेमोत्सवात आई-वडिलांसोबत व्हेलेंटाईन डे साजरा करा, त्यांना वेळ द्या, अशा पद्धतीने व्हेलेंटाईन डेचं कितीही ब्रँडिंग केलं तरी संत व्हेलेंटाईन यांच्यासोबत पुणेकर एकनिष्ठ आहेत का?, असा प्रश्न उपस्थित होतो.
कारण, यापूर्वी कधीही प्रेमसंबंधात न गुंतल्याप्रमाणे येथील जोडपी प्रेमात गुंतत आहेत.
मोठ्यांनीच सर्व मौज का घ्यावी?
शहरातील नव्याने विकसित झालेल्या भागातील केमिस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, व्हेलेंटाईन डेच्या आसपासच्या दिवसांत कंडोम विक्री मोठ्या प्रमाणात होते. तर निवासी क्षेत्रात मात्र कंडोमची विक्री स्थिर असल्याचे नोंदणी झाली आहे, अशी माहिती येथील केमिस्टचे मालक विजय चेंन्जीडीया यांनी दिली आहे. कॉलेज आणि आयटी कंपनी परिसरातही कंडोम विक्री वाढल्याचेही त्यांनी माहिती दिली. कल्याणनगर परिसरातील केमिस्ट मालक किशोल गुप्ता यांनी सांगितले की, 14 फेब्रुवारीपूर्वी कंडोम खरेदी करणा-यांची संख्या वाढून 25 टक्क्यांपर्यंत कंडोम विक्री झाली.
कपलसाठी विशेष ऑफर्स
हॉटेल्सकडून व्हेलेंटाईन डेनिमित्त स्पेशल पॅकेजद्वारे रोमँटिक डिनरसहीत रात्री राहण्यासाठी स्पेशल ऑफर दिली जाते. नगर रोडवरील केमिस्ट मालक संजय ओस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हेलेंटाईन डे या प्रेमोत्सवात कंडोमच्या विक्रीत 40 टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आले.
सुरक्षा महत्त्वाची
कंडोम खरेदी करणं आताच्या काळात नकारात्म मानले जात नाही. विशेष म्हणजे, मुलीदेखील आता कंडोम खरेदी करताना लाजत नाहीत. माझ्या स्टोअरमधून कंडोम खरेदी करण्या-या तरुणांच्या तुलनेत तरुणींची टक्केवारी जास्त असल्याची माहिती केमिस्ट मालक ओस्वाल यांनी दिली.
गर्भनिरोधकाची वाढली विक्री
कोरेगाव पार्क येथील केमिस्ट मालक नाराणय सर्वी सांगतात, की निवासी क्षेत्र असल्याने येथे कंडोम विक्री मोठ्या प्रमाणात होत नाही. 'व्हेलेंटाईन डे'च्या दिवसांत आमच्या स्टोअरमधून 10-12 टक्केच कंडोमची विक्री होते. विशेष म्हणजे, अन्य दिवसांत गर्भनिरोधक गोळ्यांच्या खरेदीचे प्रमाण खूपच कमी असते. मात्र हल्ली व्हेलेंटाईन डेच्या दिवसांत गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीत वाढ होताना दिसते.