वाजपेयींच्या वाढदिवसासाठी नाताळच्या सुटीवर गदा!
By Admin | Updated: December 5, 2015 09:10 IST2015-12-05T09:10:43+5:302015-12-05T09:10:43+5:30
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस आणि नाताळ एकाच दिवशी म्हणजे २५ डिसेंबर रोजी येत असल्याने या दिवशी सुटी असली तरी हा दिवस राज्य शासकीय अधिकाऱ्यांनी ‘सुशासन दिन’

वाजपेयींच्या वाढदिवसासाठी नाताळच्या सुटीवर गदा!
मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस आणि नाताळ एकाच दिवशी म्हणजे २५ डिसेंबर रोजी येत असल्याने या दिवशी सुटी असली तरी हा दिवस राज्य शासकीय अधिकाऱ्यांनी ‘सुशासन दिन’ म्हणून साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, असा आदेश सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी (४ डिसेंबर) काढला.
दरवर्षी २५ डिसेंबरला नाताळनिमित्त सर्व शासकीय, कार्यालयांना सुटी असते. मात्र, शासकीय कर्मचाऱ्यांच्या या सुटीवर आता गदा येणार आहे. कारण, या दिवशी सार्वजनिक सुटी असली तरी शासकीय कार्यालयांमध्ये माहिती अधिकार प्रशिक्षण, प्रशासनातील उत्कृष्ट संकल्पनांचे सादरीकरण, सेवाविषयक प्रशिक्षण, तणावमुक्ती अभियान, सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी यासंबंधीचे कार्यक्रम आयोजित करावेत, असे सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशात म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)