शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आई शप्पथ... मोदींच्या धडाडीचं शरद पवारांकडून कौतुक; तेही निवडणुकीच्या तोंडावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 18:34 IST

शरद पवारांकडून आजी-माजी पंतप्रधानांच्या कार्यशैलीची तुलना

मुंबई: अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या निर्णयांमुळे कटुता निर्माण होणार नाही याची सदैव काळजी घ्यायचे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तसं नाही. ते अतिशय कठोरपणे पावलं टाकून निर्णयांची अंमलबजावणी करतात, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजी-माजी पंतप्रधानांच्या कार्यशैलीची तुलना केली. माजी पंतप्रधान वाजपेयी यांनी नेहमीच त्यांच्या कृतीतून आणि कामातून आदर कमावला, असं कौतुकोद्गारदेखील पवार यांनी काढले. 'वाजपेयी अतिशय सुसंस्कृत होते. तर मोदी अतिशय प्रभावी आहेत. एखादी योजनेची अंमलबजावणी करताना त्यांच्यातील प्रभावीपणा दिसतो. एखादा निर्णय घेतल्यावर मोदी अतिशय कठोरपणे तो अंमलात आणतात,' असं म्हणत शरद पवारांनी दोन्ही नेत्यांच्या कार्यशैलीतील फरक स्पष्ट केला. 'कोणाच्याही मनात कटू निर्माण होणार याची काळजी नेहमी वाजपेयी साहेब घ्यायचे. त्यामुळेच लोकांच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर होता आणि आजही आहे. पण मोदींच्या कामाची पद्धत वाजपेयींपेक्षा वेगळी आहे,' असं पवारांनी 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.आजी-माजी पंतप्रधानांबद्दल बोलताना शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. 'मुख्यमंत्री शेतकरी आणि उद्योग जगताचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. फडणवीसांचं नेतृत्त्व फारसं प्रभावी आणि परिणामकारक नाही,' अशा शब्दांमध्ये पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. संकटात सापडलेल्या शेतीला भाजपा सरकार जबाबदार असून शेतकरी अस्वस्थ असल्याचं पवार म्हणाले. राज्यातील उद्योगदेखील अडचणीत सापडले आहेत. अनेक कारखाने बंद पडले आहेत, असं म्हणत पवारांनी भाजपा सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस