शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नवसाने मुल झालं अन् मुके घेवून मारलं, धनंजय मुंडेंची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 17:51 IST

नवसाने मुल झालं आणि मुके घेऊन मारलं अशी परिस्थिती या सरकारची होऊ नये, अशी घणाघाती टीका विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात ते बोलत होते. 

कोल्हापूर :  नवसाने मुल झालं आणि मुके घेऊन मारलं अशी परिस्थिती या सरकारची होऊ नये, अशी घणाघाती टीका विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात ते बोलत होते. 

शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी महापुरुषांच्या फोटोत भ्रष्टाचार केला. पंकजा मुंडे यांनी लहान मुलांच्या चिक्कीत घोटाळा केला. आमच्या मराठवाडयात एक म्हण आहे नवसाने मुल झालं आणि मुके घेवून मारलं अशी परिस्थिती या सरकारची होवू नये असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. काल आम्ही अंबाबाईचा रथ ओढला आणि अंबाबाईला राज्यात जे सरकार बसलं आहे ते भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे.या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. तेव्हा या सरकारला हद्दपार करण्यासाठी आम्हाला बळ मिळो असं साकडं घातल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.  काल देशभरात एप्रिल फुलच्या निमित्ताने लोकांनी मोदीजींचा वाढदिवस साजरा केला. मोदींचं सरकार आल्यापासून देशातील जनतेचा रोजच एप्रिल फुल होत असल्याची टीकाही मुंडे यांनी केली.

ललित मोदी पैसे घेवून पळाले, मल्ल्या पैसे घेवून पळाला, नीरव मोदी पैसे घेवून पळाला. असेच जर हे लोक पळू लागले तर १५ लाख खात्यात यायचे सोडा आपल्यावरच कर्ज होण्याची भीती आता निर्माण झाली आहे. बेरोजगारी, महागाई, वाढते गुन्हे यासाठी हे आंदोलन असल्याचे सांगून आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की वर नरेंद्र, खाली देवेंद्र आणि मंत्रालयात उंदर आहेत असा टोलाही लगावला. मुंडे यांनी आपल्या भाषणात सरकारवर चौफेर टिका करतानाच सभेमध्ये जान आणली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या सभेलाही जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. सभेच्या सुरुवातीला भुदरगड शहरातील हुतात्मा चौकात शहीदांना मानवंदना देण्यात आली.  

या सभेत आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार के.पी.पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले.या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,विधीमंडळ पक्षनेते अजित पवार,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री हसन मुश्रीफ, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री शशिकांत शिंदे, माजी खासदार निवेदिता माने, माजी खासदार रणजितसिंह मोहितेपाटील,आमदार रामराव वडकुते,आमदार प्रकाश गजभिये,आमदार जयदेव गायकवाड,आमदार श्रीमती संध्या कुपेकर,माजी आमदार के.पी पाटील,जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील,ओबीसी सेलचे अध्यध ईश्वर बाळबुधे,युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील,विदयार्थी अध्यक्ष अजिंक्य राणापाटील आदींसह भुदरगड,चंदगड,गारगोटी आणि परिसरातील पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडे