खुडूसच्या रिंगणात वैष्णव मेळा दंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 14:41 IST2016-07-11T14:33:00+5:302016-07-11T14:41:02+5:30
सकाळच्या कोवळ्या उन्हात, ढगांच्या छायेखाली दिंड्या पताकामधून दोन अश्वांचा पाठशिवणीचा खेळ पाहुन चैतन्याने फुललेल्या वैष्णवांनी उडीया खेळ करून अवघ्या परिसरात डोळ्याचे पारणे फेडले़

खुडूसच्या रिंगणात वैष्णव मेळा दंग
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ११ - सकाळच्या कोवळ्या उन्हात, ढगांच्या छायेखाली दिंड्या पताकामधून दोन अश्वांचा पाठशिवणीचा खेळ पाहुन चैतन्याने फुललेल्या वैष्णवांनी उडीया खेळ करून अवघ्या परिसरात डोळ्याचे पारणे फेडले़
अगदी सकाळचा चहा झाला की चहा रिंगणाला अशी परिस्थिती असलेल्या खुडूसच्या रिंगणात हरिपाठ उरकून ताजेतवाने झालेले वैष्णवजन एकत्र आले होते़. ८़.३० वाजता अश्व आले, ९ वाजता पालखी आली़ तोपर्यंत ज्योतीराम वाघ व जयवंत सीद या शेतक-यांच्या शेतात गावककºयांनी रिंगणाची स्वच्छता केली होती़ समर्थ रंगावलीच्या कलाकरांनी सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या़ पालखीभोवती पताकाधारी नाचत होते़ तर टाळकरी पखवाज रिंगण करून खेळत होते़ चोपदार मंडवी व मालक रिंगणाची पाहणी करत होते़ सर्व औपचारिकता पूर्ण होताच धावण्याच्या इशारा होताच दोन्ही अश्वांनी चौखुर उघळण्यास सुरूवात केली़ पाहता पाहता अवघ्या सोहळ्यामध्ये रोमांच उभे राहिले़
याठिकाणी खेळण्यास जागा चांगली असल्याने रिंगणाच्या खेळानंतर उडीच्या खेळात वारकरी देहभान विसरले़ मनमुराद खेळानंतर दुपारच्या भोजनाला सोहळा निमगाव पारी येथे विसावला़
सोमवारी खुडूस येथे माऊलीच्या दर्शनासाठी माजीमंत्री राजेश टोपे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे, आ़ प्रणिती शिंदे, माजी महापौर अलका राठोड, बाजार समितीच्या संचालिका इंदमुती अलगोंडा-पाटील आदी उपस्थित होते़
देहभान विसरून खेळला गेलेला खेळ प्रथमच पाहिला़ अनेक वृध्द महिला फुगडीचा खेळ खेळताना पाहुन बालपण आठवले आणि आम्हालाही यांच्यासोबत खेळावे वाटते़
- वर्षाराणी भोसले, तहसिलदार, माळशिरस़
रिंगण सोहळ्यातून एक वेगळी ऊर्जा मिळते़ रिंगणावेळी रोमांच उभे राहतात़ खेळाच्या हा प्रसंग निश्चितच आनंददायी वाटतो़ वेगवेगळे खेळ खेळताना स्वत:ला विसरून जातो़
- प्रतिभाताई पाचपुते़