कार्यकर्त्यांसाठी व्हेज बिर्याणीचा बेत
By Admin | Updated: February 21, 2017 13:03 IST2017-02-21T13:03:05+5:302017-02-21T13:03:05+5:30
मुंबई मनपाच्या निवडणुकीत व्यस्त असलेल्या कार्यकर्त्यांसाठी व्हेज बिर्याणीचा बेत आखण्यात आला असून त्याचे कंत्राट पोळी भाजी केंद्राला दिलेले आहे.

कार्यकर्त्यांसाठी व्हेज बिर्याणीचा बेत
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - मुंबई मनपाच्या निवडणुकीत व्यस्त असलेल्या कार्यकर्त्यांसाठी व्हेज बिर्याणीचा बेत आखण्यात आला असून त्याचे कंत्राट पोळी भाजी केंद्राला दिलेले आहे.
पोळी भाजी केंद्रातील कर्मचारी संदीप भोसले यांनी सांगितले की, २ हजार बिर्याणी प्लेटची ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी या कामात व्यस्त आहेत. परिणामी सर्वसामान्यांसाठी आज केंद्र बंद ठेवलेले आहे.
एरव्ही २५ ते ३० प्लेट धंदा करणाऱ्या केंद्रात एवढी मोठी ऑर्डर मिळाल्याने सुगीचे दिवस आले आहेत. कर्मचाऱ्यांनी रोजंदारीवर कार्यकर्ते बोलावले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या एका ऑर्डरमुळे गेल्या महिन्याभरातील नुकसान भरून निघाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे प्रभागात कोणत्या उमेदवारीची बिर्याणी शिजणार याची कल्पना निकालानंतर येईलच, मात्र सध्यातरी पोळी भाजी कर्मचाऱ्यांसह कार्यकर्त्यांची चंगळ झाल्याचे दिसले.