शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
2
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
3
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
4
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
6
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
7
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
8
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
9
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
10
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
11
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
12
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
13
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
14
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
15
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
16
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
17
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
18
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
19
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
20
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत

“माझ्या वडिलांवर झालेले वार दिसले नाहीत का”; वैभवी देशमुखांचा नामदेवशास्त्रींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 14:01 IST

Vaibhavi Santosh Deshmukh News: माझ्या वडिलांवर किती घाव झाले, ते त्यांना दिसले नाहीत का, अशी विचारणा वैभवी देशमुख यांनी केली.

Vaibhavi Santosh Deshmukh News: जे आरोपी आले होते, ते खंडणी मागण्यासाठी आले होते. त्यांनी आमच्या दलित बांधवांना हाणमार केली, म्हणून माझे वडील अडवण्यासाठी गेले होते. पण, माझ्या वडिलांवरच उलट हाणमार झाली. त्यांना वाटते की त्यांना हाणमार झाली म्हणून त्यांची मानसिक स्थिती बदलली आणि त्यानंतर त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली. मला वाटते की, त्यांची फक्त हाणमार होती, पण माझ्या वडिलांवर किती वार झाले आहेत. मग ते वार त्यांना का दिसले नाहीत, असा थेट सवाल मृत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांना केला. 

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरली आहे. यावरून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला. यानंतर आता मृत संतोष देशमुख यांचे कुटुंब भगवान गडावर जाणार आहे. नामदेवशास्त्री यांना सर्व पुरावे देऊन न्याय मागणार असल्याचे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी म्हटले होते. 

शास्त्रींनी केलेल्या वक्तव्यामुळे आम्हाला दुःख वाटते

माझ्या वडिलांवर किती वार झालेले आहेत. रक्त सांगाळलेले आहे. माझ्या वडिलांवर किती घाव झाले, ते त्यांना दिसले नाहीत का, एका चापटीनंतर त्यांच्यावर किती घाव झाले, ते त्यांना का दिसले नाहीत, अशी विचारणा वैभवी देखमुख यांनी केली. तसेच न्यायाधीश सुद्धा वकिलांच्या दोन बाजू ऐकतो आणि नंतरच मत मांडतो. परंतु, शास्त्रींनी केलेल्या वक्तव्यामुळे आम्हाला दुःख वाटते, अशी खंत वैभवी देशमुख यांनी बोलून दाखवली. याशिवाय, आम्हाला वाटते की, त्यांनी आमचीही बाजू ऐकावी आणि नंतर विधान करावे. माझे वडील वारकरी होते, त्या नात्याने जरी आमच्या घरी आले नसले तरी आम्ही त्यांना भेटणार आहोत. आमची बाजू आणि घडलेली घटना त्यांना सांगणार आहोत, असा निर्धार वैभवी देशमुख यांनी बोलून दाखवला.

दरम्यान, आमच्याजवळ पुरावे आणि कागदपत्रे आहेत, घटनाक्रम आहे, वडिलांची हत्या कशामुळे झाली ते सांगणार आहोत. त्यांना दुसरी बाजू माहिती असेल नसेल, समजली असेल नसेल ते आम्ही सांगतो. एका चापटीमुळे मारेकऱ्यांची मानसिकता बदलली असे त्यांना वाटले. पण माझ्या वडिलांची हत्या झाली त्याचे काही वाटले नाही. महाराष्ट्र एकोप्याने आमच्यासोबत आहे. तसेच सर्वांनी आमच्यासोबत राहावे, अशी अपेक्षा वैभवी देशमुख यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणPoliticsराजकारण