शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

वडेट्टीवारांच्या वक्तव्याने काँग्रेसमधील बेबनाव पुन्हा समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:10 IST

...आता उमेदवार नसल्याचे ऐनवेळी वंचितने सांगितल्यामुळे आमची धावपळ उडाली, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

मुंबई : युतीत वंचित बहुजन आघाडीच्या वाट्याला आलेल्या  एकूण जागांपैकी १६ जागा वंचितने  काँग्रेसला परत दिल्याच्या मुद्द्यावरून वडेट्टीवारांच्या वक्तव्याने काँग्रेसमध्येच अंतर्गत बेबनाव असल्याचे पुन्हा दिसून आले आहे. आमच्याकडे १६ जागांवर उमेदवार नाहीत, त्यामुळे त्या जागा तुम्ही घ्या, असे बुधवारी वंचितने काँग्रेसला कळवले होते. यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, युती करताना आम्हीही तडजोडी केल्या. आता उमेदवार नसल्याचे ऐनवेळी वंचितने सांगितल्यामुळे आमची धावपळ उडाली, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

 दोन्ही पक्षांतील बेबनावाच्या चर्चा सुरू झाल्यानंतर बुधवारी ‘वंचित’चे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी बेबनाव नसल्याचे स्पष्ट केले होते. याचवेळी आमच्याकडे काँग्रेसने दिलेल्या १६ जागांवर उमेदवार नसल्याचे स्पष्ट करून या  जागा तुम्ही लढवाव्यात, असे आम्ही काँग्रेसला कळवले होते. त्याला काँग्रेसने मान्यता दिली होती, असे मोकळे यांनी स्पष्ट केले. एकीकडे वंचितच्या विरोधात वडेट्टीवार नाराजीचा सूर आळवत असताना दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबईचे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मात्र या वादावर फारसे न ताणता  वंचित आणि काँग्रेसमधील वाद वाढू न देण्याच्या दृष्टीने सामंजस्याची भूमिका मांडली.

वंचितबरोबर युती झाली नसतानाही वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी, आमची वंचितसोबत युती झाली आहे, असे परस्पर जाहीर करून टाकले होते. त्यावर ‘वंचित’ने वडेट्टीवार यांच्यावर टीका केली होती. 

मुळात वंचित आणि काँग्रेसमधील युती आणि जागा वाटपाबाबत वडेट्टीवार यांच्याकडे कोणतीही भूमिका काँग्रेस पक्षाने दिलेली नाही.  जागा वाटपाच्या बोलणीसाठी सचिन सावंत आणि आणखी दोन सदस्यांची नियुक्ती केली होती. त्याहीवेळी जागा वाटपाची अजून प्राथमिक बोलणी सुरू असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले होते.

आज कळणार नेमके किती उमेदवार रिंगणात ?काँग्रेसने आतापर्यंत फक्त १३९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. २६ उमेदवारांची यादी अजूनही गुलदस्त्यात आहे. याचा अर्थ काँग्रेसकडेही २६ उमेदवार नाहीत की काय? असा अर्थ काढला जात आहे. यावर भाष्य करणे मात्र काँग्रेस टाळत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि  वंचितकडे नेमके किती उमेदवार आहेत, हे उद्या, शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत संपल्यानंतर स्पष्ट होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Vadettiwar's Statement Exposes Discord Within Congress Over Allotment of Seats

Web Summary : Vadettiwar's remarks on Vanchit Bahujan Aghadi returning seats revealed internal Congress discord. Despite denials, seat allocation disagreements surfaced, highlighting a lack of coordination between parties. Congress avoids commenting on candidate shortages.
टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना