शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 06:23 IST

वाहतूक पोलिसांच्या नियोजनात अभाव

वडखळ : दिवाळीची सुट्टी व भाऊबीज असल्याने मुंबईसह उपनगरातील इतर राज्यातील अनेक चाकरमानी, पर्यटकांनी अलिबाग, मुरुड, कोकणात तसेच महाबळेश्वर, पाचगणी, वाईच्या दिशेने धाव घेतली. खासगी गाड्यांनी हे चाकरमानी, पर्यटक निघाल्याने मुंबई-गोवा महामार्गावरवाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे चाकरमानी, पर्यटकांचे प्रचंड हाल झाले.

दिवाळी आणि सुटी यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेली वाहने, वाहनचालकांचा बेदरकारपणा, पुढे वाहने काढण्याच्या प्रयत्नात रस्ता अडवणे, त्यातच रस्त्यावर बंद पडलेली वाहने, यामुळे गडब- वडखळ ते पेण - अंतोरा या ठिकाणांहून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आले. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम खोळंबल्याने एकतर्फी महामार्गावरून वाहने चालवणे मोठे जिकिरीचे बनले होते. अनेक ठिकाणी छोटी वाहने पुढे काढण्याच्या नादात वाहतूक कोंडीत भर पडत होती.वाहतूक पोलिसांची यंत्रणा रस्त्यावर असली तरी नियोजनाच्या अभावामुळे वाहतूक कोंडी दूर करणे त्यांना त्रासदायकच होत होते. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले.पर्यटकांची अलिबाग, मुरुडला पसंतीपर्यटकांचा मोठ्या प्रमाणात ओढा अलिबाग, रेवदंडा, श्रीवर्धन, मुरुड या समुद्रकिनारपट्टीकडे असल्याने, तेथे जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी वाढली होती. दैनंदिन प्रवास करणारी एसटीची सेवा, अवजड माल वाहू वाहने यांची भरीस भर पडली आहे.मात्र ही वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे मुंबई- गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी वाहन चालक, प्रवाशांकडून होत आहे. 

टॅग्स :Mumbaiमुंबईhighwayमहामार्गTrafficवाहतूक कोंडी