शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Uttarakhand Accident: उत्तरकाशीला भीषण अपघात! महाराष्ट्रातील भाविकांची बोलेरो दरीत कोसळली; तिघांचा मृत्यू, १० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 08:37 IST

मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश असून काही जण अंधेरी तर काहीजण भंडारा जिल्ह्यातील आहेत. जखमींना बडकोट आणि नौगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वी गंगोत्रीला जात असताना कार दरीत कोसळून आग लागल्याने सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. यानंतर गुरुवारी उत्तरकाशीमध्ये आणखी एक भीषण अपघात झाला आहे. महाराष्ट्रातील भाविकांची बोलेरो कार यमुनोत्रीच्या मार्गावर असताना दरीत कोसळली. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. 

मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश असून काही जण अंधेरी तर काहीजण भंडारा जिल्ह्यातील आहेत. जखमींना बडकोट आणि नौगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा हा अपघात झाला. १२ भाविकांना घेऊन हे वाहन जानकीचट्टीहून बड़कोटला निघाले होते. रात्री उशिरा ही कार यमुनोत्री धामपासून २८ किमी दूर ओजरीजवळ असताना दरीत कोसळले.

समोरून येणाऱ्या बसला तीव्र वळणावर साईड देत असताना चालकाने कार मागे घेतली. याचवेळी नियंत्रण गमावल्याने पाठीमागे दरीत जाऊन कार कोसळली. पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने शोध आणि बचाव कार्य राबवत चार लहान मुलांसह दहा जखमी प्रवाशांना दरीतून वर आणले. अपघातस्थळी रस्ता अरुंद असून सुरक्षेसाठी संरक्षक कठडे देखील नाहीत. मृत आणि जखमी सारे महाराष्ट्रातील आहेत. 

मृतांची नावे : पूरण नाथ (40) रा. अंधेरी ईस्ट मुंबई, जयश्री अनिल कोसरे (26) रा. तुमसर, भंडारा, अशोक महादेव राव (40) रा. नागपूर, अशी मृतांची नावे आहेत. 

जखमींची नावे : प्रेरणा (8), अंजू अशोक राव (4); बोदी (10) भंडारा; प्रमोद तुलसी (52); बाळकृष्ण जीटू (41) रा. भंडारा; लक्ष्मी बालकृष्ण कोसरे (46) भंडारा; दिनेश (35) रा. भंडारा; मोनिका (24) रा. भंडारा; कृषिता (15), रचना (38) रा. भंडारा अशी जखमींची नावे आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :AccidentअपघातUttarakhandउत्तराखंड