उत्तर नागपुरात काँग्रेसमध्ये फूट
By Admin | Updated: May 22, 2014 02:09 IST2014-05-22T02:09:03+5:302014-05-22T02:09:03+5:30
लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर येताच उत्तर नागपुरात काँग्रेसमधील गटबाजी उफाळून समोर आली आहे.

उत्तर नागपुरात काँग्रेसमध्ये फूट
नागपूर : लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर येताच उत्तर नागपुरात काँग्रेसमधील गटबाजी उफाळून समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपला उत्तर नागपुरात आघाडी मिळाली. याचे खापर रोहयो मंत्री नितीन राऊत यांच्यावर फोडले जात आहे. काँग्रेसचे नागपूर शहर महामंत्री राजा द्रोणकर यांनी राऊत यांनी आपल्या सर्मथकांना विलास मुत्तेमवार यांच्या विरोधात भडकविले तसेच पक्षविरोधी कारवाया केल्या, असा आरोप केला आहे. उत्तर नागपुरातील पक्षांतर्गत राऊत विरोधक पुन्हा एकदा एकवटले आहेत. द्रोणकर यांच्यासह वेदप्रकाश आर्य, विनोद सोनकर, इरसाद मलिक, शंकर मेo्राम, फिलीप जैस्वाल, विवेक निकोसे आदींनी समोर येत राऊत यांच्या विरोधात उघड बंड पुकारले आहे. राऊत यांच्या विरोधकांना एकत्र करीत एक फोर्स उभारण्याची तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून आज द्रोणकर यांनी राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, उत्तर नागपुरात काँग्रेस १८ हजार ५४0 मतांनी मागे राहिली. वेळेवर काँग्रेस कार्यकर्ते सक्रिय झाले नसते तर ही लीड ५0 हजारावर गेली असती. राऊत यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या. याची तक्रार प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांच्याकडे करूनही त्यांनी कारवाई केलेली नाही. राज्यात काँग्रेसची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नितीन राऊत, माणिकराव ठाकरे, मोहन प्रकाश यांना काँग्रेसमधून निलंबित करावे, अशी मागणीही द्रोणकर यांनी केली. दलिताच्या नावावर राऊत यांनी नेहमी समाजातील लोकांचा छळ केला आहे. गेल्या १५ वर्षात सत्तेत असूनही राऊत यांनी समाजाच्या भल्यासाठी काहीच केले नाही. जेव्हा त्यांच्याबाबत काही घटते तेव्हा ते दलित असल्याचे सांगतात. नागपुरात काँग्रेस जिवंत ठेवायची असेल तर राऊत यांना पक्षातून काढण्याची मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)