उस्मानाबादला ट्रक-बस अपघातात ४ ठार
By Admin | Updated: January 10, 2015 01:29 IST2015-01-10T01:29:20+5:302015-01-10T01:29:20+5:30
ट्रक-बसची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात बसचालकासह चौघांचा मृत्यू झाला असून, २० प्रवासी जखमी झाले आहेत़

उस्मानाबादला ट्रक-बस अपघातात ४ ठार
उस्मानाबाद : ट्रक-बसची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात बसचालकासह चौघांचा मृत्यू झाला असून, २० प्रवासी जखमी झाले आहेत़
यातील सहाजण गंभीर आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळी कळंब तालुक्यातील चोराखळी पाटीजवळ घडला़ मृतांमध्ये दिलीप मारूती
डोके (४०, बसचालक), नानासाहेब गोयकर (४० ), संतोष बबन नागरगोजे (३२) व इंदुबाई मोहन बेंद्रे (६०) यांचा सामवेश आहे़
नगर- तुळजापूर ही बस शुक्रवारी सकाळी तुळजापूरकडे येत असताना चोराखळी पाटीजवळील भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली़ यात उपरोक्त चौघांचा मृत्यू झाला़ (प्रतिनिधी)