नाविन्यपूर्ण शैक्षणिक बँकेचा प्रयोग यवतमाळात

By Admin | Updated: September 19, 2014 00:50 IST2014-09-19T00:50:40+5:302014-09-19T00:50:40+5:30

शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शिक्षकांचा चांगला उपक्रम इतर शाळांमध्ये राबविता यावा, त्यातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी एज्युकेशनल इनोव्हेशनल बँक (नाविन्यपूर्ण

Using innovative educational bank in Yavatmal | नाविन्यपूर्ण शैक्षणिक बँकेचा प्रयोग यवतमाळात

नाविन्यपूर्ण शैक्षणिक बँकेचा प्रयोग यवतमाळात

दर्जेदार शिक्षणाचे मॉडेल : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत स्वतंत्र विभाग
रूपेश उत्तरवार -यवतमाळ
शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शिक्षकांचा चांगला उपक्रम इतर शाळांमध्ये राबविता यावा, त्यातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी एज्युकेशनल इनोव्हेशनल बँक (नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम) तयार करण्यात येत आहे. यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाशी करार करण्यात आला. या उपक्रमाचा प्रारंभ यवतमाळातून होत असून त्यासाठी येथील जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत (डायट) स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.
रविजे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, आयआयएम अहमदाबाद आणि स्टेट इनोव्हेशनल अ‍ॅण्ड रिसर्च फाउंडेशन सोलापूर यांचा शालेय शिक्षण विभागाशी १६ आॅगस्टला तीन वर्षासाठी करार झाला. याला महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे सहकार्य करणार आहे. तीन वर्ष हा उपक्रम राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये राबविला जाणार आहे. शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी हा उपक्रम शिक्षण विभागाने हाती घेतेला आहे. करारा नंतर पहिली कार्यशाळा यवतमाळात नुकतीच पार पडली.
यामध्ये जिल्ह्यातील २०० शाळांतील शिक्षकांनी भाग घेतला. प्रयोगाच्या माध्यमातून शिक्षणात बदल झाले असे प्रयोग या ठिकाणी सादर करण्यात आले. यातील उत्कृष्ट उपक्रमांची दखल घेण्यात आली. हे प्रयोग राज्यातील शाळांसाठी खुले केले जाणार आहेत. स्वतंत्र संकेतस्थळावर त्याची नोंद होणार आहे. यावर संपूर्ण उपक्रमाची माहिती, शिक्षकाचा फोटो आणि त्याचा मोबाईल नंबर असणार आहे. संकेतस्थळाचा वापर करून गुणवत्ता सुधारण्यासाठी शाळेला उपक्रम राबविता येणार आहे. इतकेच नव्हे तर मोबाईलच्या मदतीने शिक्षकांना त्यातील अडचणी विचारता येणार आहेत.
यासाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत इनोव्हेशनल सेल स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र संकेतस्थळ राहणार आहे. यामध्ये या संपूर्ण उपक्रमांची नोंद राहणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची नोंद या उपक्रमात करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे राज्य समन्वयक सिध्दराम माशाळे, बाळासाहेब वाघ यांनी जिल्ह्यातील शिक्षकांकडून उपक्रमांची माहिती घेतली. ही माहिती इनोव्हेशनल बँक उपक्रमात समाविष्ट केली जाणार आहे.

Web Title: Using innovative educational bank in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.