पुणे विभागात पाण्याचा वारेमाप वापर

By Admin | Updated: May 7, 2014 21:42 IST2014-05-07T20:35:33+5:302014-05-07T21:42:46+5:30

पुणे विभागात गेल्या ८ महिन्यात वारेमाप वापर झाल्याने आता राज्यात शिल्लक पाणीसाठ्याच्या टक्केवारीचा विचार करता सर्वात कमी पाणीसाठा या विभागात आहे़

The use of water scales in Pune division | पुणे विभागात पाण्याचा वारेमाप वापर

पुणे विभागात पाण्याचा वारेमाप वापर

दुष्काळी परिस्थितीपेक्षाही पाणीसाठा कमी : सर्वात कमी टक्केवारी

पुणे : गेल्या वर्षी पावसाळ्यात भरपूर पाऊस होऊन राज्यातील जवळपास सर्व धरणे भरुन वाहिली होती़ असे असताना पाण्याचा सर्वाधिक साठा असलेल्या पुणे विभागात गेल्या ८ महिन्यात वारेमाप वापर झाल्याने आता राज्यात शिल्लक पाणीसाठ्याच्या टक्केवारीचा विचार करता सर्वात कमी पाणीसाठा या विभागात आहे़ विशेष म्हणजे २०१३ मध्ये दुष्काळी परिस्थिती असताना, आणि २०१२ मधील आजच्या पाणीसाठ्याशी तुलना करता हा तो यंदा खूपच कमी असल्याचे दिसून येते़
राज्यातील अन्य विभागाशी तुलना करता पुणे विभागातील प्रकल्पीय साठाचे प्रमाण खूप जास्त आहे़ त्यामुळे एकूण पाणीसाठ्याचे प्रमाणही जास्त दिसत असले तरी शिल्लक पाणीसाठ्याची टक्केवारी पाहिल्यास अन्य विभागापेक्षा पुणे विभागात आजच्या घडीला केवळ २६ टक्के पाणी शिल्लक आहे़ त्याचवेळी २०१३ मध्ये ३७ टक्के, २०१२ मध्ये ४६ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता़
पुणे विभागात स‘ाद्रीच्या डोंगररांगा व त्यामध्ये उभारलेल्या धरणांमुळे सर्वाधिक पाणीसाठा या विभागात होतो़ त्यामुळे हा प˜ा साखर प˜ा म्हणून ओळखला जातो़ २०१३ मधील दुष्काळी वर्षातही या विभागातील अनेक धरणे १०० टक्के भरली नव्हती़ तसेच २०१२ मध्येही हीच परिस्थिती होती़ याच्या उलट गेल्या वर्षी सर्व धरणे १०० टक्के भरली होती़ उजनीसारखे मोठे धरण ११० टक्के भरले होते़ असे असतानाही आज पुणे विभागातील धरणातील पाणीसाठा हा २०१३ व २०१२ च्या तुलनेत कमी झाला आहे़ निवडणुकीच्या काळात केवळ खडकवासला प्रकल्पच नव्हे तर अन्य कोयना, कृष्णा व अन्य धरण प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यानेच ही स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे़
हवामान खात्याने यंदा मान्सूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी असणार असल्याचे जाहीर केले आहे़ त्यामुळे यदा कदाचित मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला अथवा जुलैमध्ये मोठा खंड पडला तर पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाण्याची टंचाई भीषण होऊ शकते़
 

मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील उपयुक्त साठ्याची तुलना (द़ ल़ घ़ मी़)(५ मे २०१४ ची स्थिती)
प्रादेशिक प्रकल्पीय आजचा टक्के २०१३साठा टक्के २०१२चासाठा टक्के
कोकण १६४४ ५८८ ३६ ६६६ ४१ ५८० ३५
मराठवाडा ७६०१ १९९६ २६ ४६९ ६ ८७७ १२
नागपूर ३८९१ १७२९ ४४ ११६० ३० १०९९ २६
अमरावती २९११ ११३० ३९ ७१४ २५ ५९१ २०
नाशिक ४७४१ १३७९ २९ ६०८ १३ ७९९ १७
पुणे १०२६६ २६५८ २६ ३७७५ ३७ ४७५२ ४६
इतर धरणे ६१६१ १७४२ २८ २१३७ ३५ २२९६ ३७

एकूण महाराष्ट्र ३७२१५ ११२२२ ३० ९५२९ २६ १०९१४ २९

 

Web Title: The use of water scales in Pune division