निवडणूक कामांसाठी परिवहनच्या बसेसचा वापर

By Admin | Updated: October 15, 2014 04:08 IST2014-10-15T04:08:43+5:302014-10-15T04:08:43+5:30

मीरा-भार्इंदर पालिकेच्या परिवहन सेवेतील सुमारे २५ टक्के बस निवडणूक कामाला जुंपल्याने प्रवाशांना बसेस कमी पडल्या. परिणामी, रहिवाशांना एसटी तसेच रिक्षांचा आधार घ्यावा लागला.

Use of transport buses for election work | निवडणूक कामांसाठी परिवहनच्या बसेसचा वापर

निवडणूक कामांसाठी परिवहनच्या बसेसचा वापर

राजू काळे, भार्इंदर
मीरा-भार्इंदर पालिकेच्या परिवहन सेवेतील सुमारे २५ टक्के बस निवडणूक कामाला जुंपल्याने प्रवाशांना बसेस कमी पडल्या. परिणामी, रहिवाशांना एसटी तसेच रिक्षांचा आधार घ्यावा लागला.
पालिकेने ९ आॅक्टोबर २०१० ला केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत ठेकेदाराद्वारे स्थानिक परिवहन सेवा सुरू केली. पालिकेला त्यातून रॉयल्टीच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. सुरुवातीला ही सेवा १०२ बसवर सुरू करण्यात आली. परंतु, या नवीन ५० बस तांत्रिकदृष्ट्या कमकुवत ठरल्याने प्रशासन व ठेकेदाराच्या योग्य पाठपुराव्याअभावी बसनिर्मिती करणाऱ्या कंपनीने कमी वेळेतच नादुरुस्त होत असलेल्या बसकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप परिवहन विभागाच्या सूत्रांकडून होत आहे. त्यातच या सेवेतील पूर्वीच्या ठेक्यातील बस नादुरुस्त झाल्याने ठेकेदाराने २०१२ मध्ये त्या भंगारात विकल्या. उर्वरित नवीन ५० बसही अवघ्या ३ वर्षांत नादुरुस्त झाल्याने त्यांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय आहे. त्यातील सुमारे ४० बस सध्या प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यांवर धावत असल्याने दररोज सुमारे ५० हजार प्रवाशांना लाभदायक ठरणारी परिवहन सेवा डळमळीत झाली आहे. ८ ते १० बस निवडणुकीसाठी करारबद्ध करण्यात आल्या आहेत. यामुळे वेळापत्रक कोलमडले आहे.

Web Title: Use of transport buses for election work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.