शिलालेखाचा वापर कपडे धुण्यासाठी
By Admin | Updated: July 2, 2016 03:31 IST2016-07-02T03:31:56+5:302016-07-02T03:31:56+5:30
नरविर चिमाजी आप्पांच्या पराक्रमाने प्रसिद्ध झालेल्या वसईतील शिलालेख मात्र, दुर्लक्षित झाले

शिलालेखाचा वापर कपडे धुण्यासाठी
वसई : नरविर चिमाजी आप्पांच्या पराक्रमाने प्रसिद्ध झालेल्या वसईतील शिलालेख मात्र, दुर्लक्षित झाले असून, या शिलालेखाचा चक्क कपडे धुण्यासाठी वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती शिवसेनेचे गटनेते धनंजय गावडे यांनी उजेडात आणली आहे.
शेकडो वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभुमी लाभलेल्या वसई तालु्नयात वसईचा किल्ला,चारही बाजुंनी खाऱ्या पाण्याने वेढलेला आणि त्यात गोड्या पाण्याची विहीर असलेला अर्नाळा किल्ला,बाजारपेठ असलेली शुर्पारक नगरी.या नगरीतील भगवान गौतम बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेले बौद्ध स्तुप,भगवान परशुरामाच्या स्पर्शाने पावन झालेले चक्रेश्वर महादेव मंदिर, निर्मळचे शंकराचार्य मंदिर,पौराणिक निर्मळ व विमल तलाव अशा अनेक ठिकाणी अजुनही इतिहासाच्या खाणा-खुणा दिसून येत आहेत.या तालु्नयात प्राचीन काळी अनेक सुंदर मंदिरे,शिलालेख,शिल्प अस्तित्वात होते. काळाच्या ओघात ते नष्ट होत चालले आहेत.
मात्र, पुरातत्व विभागाच्या, महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे हा पुरातन ठेवा अडगळीत पडला आहे. (प्रतिनिधी)
तलावाचे खोदकाम करताना, विहीरीतील गाळ काढताना त्यात काही पुरातन वस्तु, भग्न मूर्ती, शिल्प आणि शिलालेख सापडले आहेत.